Shravan Special 2024 : साबुदाणा वडा तेल फार पितात अन् फुगत नाहीत? 'ही' रेसिपी फॉलो करा, खाणारे बोट चाटत राहतील

Sabudana Vada Recipe : श्रावणात उपवासाला अनेक लोक झटपट बनतात म्हणून साबुदाणा वडे बनवतात. मात्र अनेक लोकांचे साबुदाणा वडे छान फुगत नाही आणि तेल फार पितात. त्यामुळे साबुदाणा वड्याला चांगली चव लागत नाही. त्यामुळे साबुदाणा वडा बनवताना 'ही' रेसिपी फॉलो करा.
Sabudana Vada Recipe
Shravan SpecialSAAM TV
Published On

श्रावणात उपवासाला मोठ्या प्रमाणात साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात. उदा. साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ, खीर. पण सर्वात अधिक प्रमाणात साबुदाणा वडे खाल्ले जातात. कारण ते बनवायला सोपे असतात. तसचे खायला देखील चविष्ट लागतात. साबुदाणा वडे बनवायला सोपे आणि खायला रूचकर जरी असले तर ते छान फुगण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मगच साबुदाणा वड्यांचा स्वाद वाढतो. ही परफेक्ट रेसिपी फॉलो करून तुम्ही झटपट छान फुगलेले हॉटेल स्टाईल साबुदाणा वडे बनवू शकता.

खमंग, खुसखुशीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी रेसिपी फॉलो करा

साहित्य

  • साबुदाणा

  • बटाटा

  • हिरवी मिरची

  • जिरे

  • कोथिंबीर

  • तेल

  • मीठ

  • शेंगदाण्याचं कूट

  • सैंधव मीठ

Sabudana Vada Recipe
Tomato Soup Recipe : टोमॅटो सूप घरच्याघरी टेस्टी आणि यम्मी कसं बनवायचं? वाचा रेसिपी

कृती

उपवासाला खुसखुशीत साबुदाणा वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात थोडे पाणी आणि स्वच्छ केलेला साबुदाणा घालून सकाळसाठी रात्री साबुदाणा भिजत ठेवा. आता सकाळी पाहिलत तर तुम्हाला दिसेल की, साबुदाणा छान फुलून आला आहे. आता झटपट साबुदाणा वडा बनवण्यासाठी एका भांड्यात कुस्करून उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य मस्त एकजीव करून घ्यावे. लक्षात ठेवा यात जास्तीचे पाणी टाकू नये. नाहीतर पीठ चांगले होणार नाही. यामुळे साबुदाणा वडे तळताना तेल फार पितील आणि नीट फुगणार देखील नाही. आता एका प्लास्टिक शीटवर तेल लावून वडे छान थापून घ्यावे. दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वडे खरपूस तळून घ्या. अशाप्रकारे कुरकुरीत साबुदाणा वडा तयार झाला.तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता.

Sabudana Vada Recipe
Poha Bhel Recipe : पोह्यांची भेळ तुम्ही कधीच खाल्ली नसेल; रेसिपी वाचा आणि घरीच बनवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com