Tomato Soup Recipe : टोमॅटो सूप घरच्याघरी टेस्टी आणि यम्मी कसं बनवायचं? वाचा रेसिपी

Healthy Tomato Soup Recipe : टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स सुद्धा असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टोमॅटो सूप कसं बनवायचं याची रेसिपी सांगणार आहोत.
Healthy Tomato Soup Recipe
Tomato Soup RecipeSaam TV
Published On

आपण घरी बनवल्या जाणाऱ्या विविध भाज्यांमध्ये टोमॅटो टाकतो. टोमॅटोची चव काहींना फार आवडते. त्यामुळे अनेक व्यक्ती जेवणात कच्चा टोमॅटो देखील खातात. टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स सुद्धा असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टोमॅटो सूप कसं बनवायचं याची रेसिपी सांगणार आहोत.

Healthy Tomato Soup Recipe
Pumpkin Soup Recipe : हिवाळ्यातील अनेक आजारांवर रामबाण ठरेल भोपळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती ही वाढेल; पाहा रेसिपी

साहित्य

लाल टोमॅटो

गाजर

पाणी

पीठ

चिली फ्लेक्स

ऑरिगॅनो

तेल

बटर

कांदा

लसूण

कृती

सर्वात आधी कांदा, टोमॅटो आणि गाजर यांचे जाडसर काप करून घ्या. हे काप पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात सुरुवातीला बटर टाका. बटर वितळत असताना यामध्ये तेल सुद्धा टाकून घ्या. त्यानंतर यामध्ये आधी कांदा टाका. कांदा टाकल्यावर त्यामध्ये लगेचच टोमॅटो आणि गाजर सुद्धा टाकून घ्या. तसेच यावर तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या.

सर्व साहित्य कुकरमध्ये छान परतून घ्या. सर्व काही परतल्यावर त्यामध्ये अर्धा टोप पाणी घ्या आणि कांदा, टोमॅटो, गाजर छान शिजवून घ्या. सर्व भाज्या छान शिजल्यावर गॅस बंद करा आणि तपासून घ्या सर्व काही छान शिजले आहे की नाही. पुढे गरम भांड्यातील मिश्रण दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या. तसेच हे पूर्ण थंड होऊ द्या.

भाज्या छान थंड झाल्या की, त्या मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घ्या. मिक्सरला बारीक केल्यावर ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर दुसरं एक भांडे घ्या. यामध्ये पुन्हा थोडं बटर टाका. तसेच यामध्ये बारीक चॉप केलेला लसूण परतून घ्या. लसूण छान परतला की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण टाका.

तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून तुम्ही हे घट्ट किंवा पातळ करू शकता. आता पुढे या मिश्रणात चीलिफ्लेक्स आणि ऑरिगॅनो मिस्क करा. याला एक छान उकळी काढून घ्या. तयार झालं तुमचं टोमॅटो सूप. यावर तुम्ही कोथिंबीर टाकून सुद्धा खाऊ शकता. टोमॅटोपासून बनवलेलं असं सूप फार पौष्टिक असतं. सर्दी, खोकला अशा समस्या असलेल्या व्यक्तींनी आठवड्यातून एकदा तरी हमखास हे सूप प्यायलं पाहिजे.

Healthy Tomato Soup Recipe
Pumpkin Soup Recipe : हिवाळ्यातील अनेक आजारांवर रामबाण ठरेल भोपळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती ही वाढेल; पाहा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com