Shreya Maskar
पावसाळ्यात नेहमीचे कांदा, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला? तर टोमॅटो भजी आवर्जून बनवा.
चमचमीत टोमॅटो भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो, बेसन, कोथिंबीर , आले, हिरवी मिरची, हळद, धणे, मीठ , लसूण, लिंबू, तांदळाचे पीठ, शेंगदाणे, थोडी साखर इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो भजी बनवण्यासाठी खूप कच्चा टोमॅटो वापरू नये.
सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून टोमॅटो गोल आकारात स्लाइसमध्ये कापा.
यानंतर मिक्सरला धणे, आलं, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, शेंगदाणे, थोडी साखर आणि पाणी घालून जाडसर वाटण बनवा.
आता एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ , कोथिंबीर, हळद, मीठ, तयार केलेले वाटण थोडे पाणी घालून छान एकजीव करून घ्या.
या मिश्रणात टोमॅटोचे काप घोळवून घ्या. सर्व बाजूने मसाला लागेल याची काळजी घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात टोमॅटोचे स्लाइस टाकून तळून घ्या.
सर्व्ह करताना वरून चाटमसाला टाकून पुदिन्याच्या चटणीसोबत टोमॅटो भजीचा आस्वाद घ्या.