Shreya Maskar
पावसात संसर्गापासून वाचण्यासाठी हिरव्या भाज्या मदत करतात.
पावसात चटपटीत आणि पौष्टीक खायचे असल्यास मंच्युरियन पॅनकेक बनवा.
मंच्युरियन पॅनकेक बनवण्यासाठी शिमला मिरची, कांदा, गाजर, कोबी, आलं, लसूण, हिरवी मिरची, काळी मिरी, सोया सॉस, तांदळाचे पीठ, तेल, शेजवान चटणी आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
मंच्युरियन पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम शिमला मिरची, कांदा, गाजर, कोबी, आलं, लसूण बारीक चिरून घ्या.
आता या मिश्रणात काळी मिरी, मीठ, सोया सॉस, तांदळाचे पीठ, शेजवान चटणी घालून छान एकजीव करून घ्या.
पाणी घालून पॅन केक बॅटर बनवून घ्या.
आता गॅस मंद आचेवर ठेवून त्यात तेल घाला.
तयार झालेले मिश्रण पॅनवर पॅनकेकच्या आकारात गोल पसरवा.
दोन्ही बाजूने तेल लावून पॅनकेक मस्त भाजून घ्या.
अशाप्रकारे पावसाळ्यात तुमचे स्वादिष्ट मंच्युरियन पॅनकेक तयार झाले.
शेजवान चटणीसोबत तुम्ही मंच्युरियन पॅनकेकचा आस्वाद घेऊ शकता.