Shreya Maskar
पावसात आपल्याला झणझणीत खायला आवडते.
जेवताना नेहमीच्या शेंगदाणा, लसणाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल. तर, पावसात न विसरता जवसाची चटणी बनवा.
जवसाची चटणी बनवण्यासाठी जवस बिया, लाल मिरची, ऑलिव्ह ऑइल, जिरे, चिंच, कोथिंबीर, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते.
जवसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल टाकून त्यात जवसाच्या बिया खरपूस भाजून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये जिरे टाकून हलके परतून घ्यावे.
जवस, चिंच आणि जिरे घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या.
आता या मिश्रणात मीठ आणि मिरची मिक्स करा.
हे सर्व मिश्रण पाण्याच्या साहाय्याने मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्या.
शेवटी या चटणीत तेल आणि कोथिंबिर घाला. अशाप्रकारे तुमची चटकदार जवसाची चटणी तयार झाली.