Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Yuva Sena Jilha Pramukh Resigned : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती थांबतच नाही. तब्बल एक तप म्हणजेच १२ वर्षे पक्षासाठी काम केलेल्या नागपूरमधील नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
yuva sena district chief lokesh bawankar resigns from thackeray camp after 12 years
yuva sena district chief lokesh bawankar resigns from thackeray camp after 12 yearssaam tv
Published On
Summary
  • नागपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

  • १२ वर्षे पक्षात काम केलेल्या तरुण नेत्याचा राजीनामा

  • आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंचा जवळचा नेता

पराग ढोबळे, नागपूर | साम टीव्ही प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, १२ वर्षे शिवसेनेत सक्रिय सहभाग, नागपूर ग्रामीणचं युवा सेना जिल्हाप्रमुखपद आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा जवळचा नेता अशी ओळख असलेल्या लोकेश बावनकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात महत्वाच्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नागपूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीणचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बावनकर यांनी आपला राजीनामा थेट आमदार आदित्य ठाकरे यांना पाठवला आहे. त्यात त्यांनी दोन कारणंही नमूद केली आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती आणि स्थानिक राजकारणामुळं त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकेश बावनकर हे मागील १२ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय होते. युवासेना प्रमुख (ठाकरे गट) आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचे ते जवळचे सहकारीही होते. नागपूर ग्रामीणचा युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना पक्षाची विचारधारा, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा संदेश, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व गावागावात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पक्षाच्या प्रत्येक कार्यात, आंदोलन असो की संघटनाबांधणी मी संपूर्ण समर्पण भावनेने त्यात सहभाग घेतला. तरूण, कार्यकर्ते यांच्यात पक्षाची ओळख मजबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण मागील काही काळापासून माझ्या मनात प्रचंड गोंधळ, अस्वस्थता निर्माण झाली. पण संघटनेत घेण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरील निर्णयांशी मी सहमत नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याचं बावनकर यांनी पत्रात सांगितलं.

yuva sena district chief lokesh bawankar resigns from thackeray camp after 12 years
MNS Leader Attacked : मनसेच्या शहरप्रमुखाला बेदम मारहाण, निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वादातून हल्ला झाल्याचा संशय

सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का

दुसरीकडे, सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे ते मोठे बंधू आहेत. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे कुर्डुवाडी येथील १३ माजी नगरसेवक, करमाळ्यातील चार माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

yuva sena district chief lokesh bawankar resigns from thackeray camp after 12 years
पुण्यानंतर मुंबईत जमीन घोटाळा? 200 कोटींची जमीन फक्त 3 कोटींमध्ये खरेदी, मंत्र्यांवरील आरोपांनी खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com