
बुलडाणा -
हिवरखेड ते सोनाळा रोडवर भीषण अपघात
चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट पुलाखाली
सुदैवाने जीवित हानी टळली
मात्र गाडीतील प्रवाशी जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात केले भरती
सोलापूर -
- सोलापूर विमानतळ आता बिझी एअरपोर्ट होणार, विमानसेवेची व्याप्ती वाढली
- मुंबई - बेळगाव रोज तर बंगळूरुला दर रविवारी सोलापुरातून विमान घेणार उड्डाण..
- 10 नोव्हेंबर पासून सोलापूर - मुंबई - बेळगाव हवाई मार्गावर दररोज विमानसेवा असणार
रत्नागिरी - महाराष्ट्रमध्ये महायुती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत योगेश कदम
रत्नागिरी मध्ये देखील महायुती व्हावी यासाठी देखील आम्ही संपर्कात आहोत
स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती म्हणून लढलो तर महाविकास आघाडी कुठेच पुढे येणार नाही
काँग्रेस मुक्त भारत आमचा नारा होता काँग्रेस मुक्त महाराष्ट्र यासाठी आमची एकी आवश्यक
वैभव खेडेकर यांच्या विधानाला आपण जास्त महत्व देत नाही आणि ना वैभव खेडेकरांना आपण महत्त्व देत
विकास निधी हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून घेत असतो त्यामुळे येथे श्रेय वादाचा विषयच नाही
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल तशा सूचना देण्यात आले आहेत
उद्धव ठाकरे यांनी कुठल्या बांधावर जावं हा त्यांचा प्रश्न आहे यावर मी काहीही बोलू इच्छित नाही
यवतमाळमध्ये ठेवीदारांना 20% रक्कम देण्यात सुरुवात
डबघाईस आलेल्या यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेतील ठेवीदारांना 20 टक्के रक्कम समप्रमाणात वाटप करण्यास सुरुवात झाली
उर्वरित 80 टक्के रक्कम मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले
यासंदर्भात माजी मंत्री मदन येरावार यांनी पाठपुरावा केला होता.
पुणे -
पुण्याचे माजी विधान परिषद आमदार अनिल भोसले यांच्यावर बँक घोटाळा प्रकरणी अखेर पीएमएलए कोर्टात आरोप निश्चिती झाली
त्यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय...
याच घोटाळ्यात ते गेली अनेक महिने तुरूंगात आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिशय प्रतिष्ठेच्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या बिगुल अखेर चार नोव्हेंबरला वाजला
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली,आरमोरी, देसाईगंज वडसा या तीन नगरपालिकांसाठी रणसंग्राम रंगणार आहे
या निवडणुका शहरी मतदारांचा कॉल ठरविणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची ही लिटमस टेस्ट मानली जात आहे
नाशिक -
- राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे
- द्वारका ते कसारा टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक
- खंडणी मागितल्याप्रकरणी ३ जणांना पोलिसांकडून अटक
- तर अवैध सावकारी करणाऱ्या आणि अवैध सावकारीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या सावकाराला देखील पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक पोलिसांच्या ऑपरेशन गुन्हेगारी क्लीन अप मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
तुळजापुरात माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक
तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी सुरू केलं आमरण उपोषण
म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याकडे 2023 - 24 हंगामातील बिले प्रलंबित असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
चालू हंगामात 3000 रुपये प्रति टन पहिला हप्ता उचल म्हणून देण्याची मागणी
शेतकऱ्यांना पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत काढता येणार
सततच्या पावसाने यावर्षी रब्बी हंगाम लांबला असून यासोबत पीक विमा काढण्यासाठी वाढीव मुदत मिळाली आहे.
रब्बी हंगामातील सहा पिकांसाठी शेतकऱ्यांना पिकांसाठी विमा उतरविता येणार आहे.
15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पिकाचा विमा काढता येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी भारतीय कृषी विमा कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.
नागपूर -
- नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसने घेतलेल्या मुलाखतीवरून गटबाजी पाहायला मिळालीय
- बैठकीला जिल्हा निवड मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आलीय...
- तातडीने जिल्हा प्रभारी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी फोनवरून मुलाखती थांबविण्याचा निरोप दिला. मात्र गर्दी झाल्यानं इच्छुकांना परत न पाठवता मुलाखती पार पडल्यात....
- नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात मुलाखती झाल्यात...
- नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा उत्साह होता. इच्छुक ५३० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. प्रत्येकाने आपण कसे सक्षम आहोत, हे नेत्यासमोर मांडले.
नागपूर -
- यंदाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते होऊन १९ डिसेंबरपर्यंत असणार आहे...विधानभवन सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार असल्याचं संगीतले जात आहेय..
- विधानभवन सचिवालयाने हे सत्र ८ डिसेंबरलाच सुरू होणार असल्याच पत्र नागपूर विधानभवनातील कक्ष अधिकारी यांनापाठवण्यात आले आहे..
- पत्रात विधानभवनातील पीठासीन अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या कक्ष आणि निवास व्यवस्थेची तयारी करण्याचे निर्देश दिले
- दोन आठवड्यांच्या या सत्रात एकूण १० दिवसांचे कामकाज असणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.