Siddhi Hande
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल. आता बांदेकर कुटुंबाच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकरचं लग्न ठरलं आहे.
सोहमच्या लग्नासाठी केळवणदेखील सुरु झाले आहेत. मराठी कलाकारांनी त्याचे केळवण केले आहे.
सोहम बांदेकरची होणारी बायको आहे तरी कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पुजा बिरारी यांचं नाव जोडलं जात आहे.
पूजा बिरारी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सध्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
पुरारी बिरारी ही गणेशोत्सवात आदेश बांदेकरांच्या घरीदेखील आली होती. ती आरती करतानाही दिसली.
यामुळे पूजा बिरारी हीच सोहम बांदेकरची होणारी बायको असल्याच्या चर्चा सुरु आहेत.