Shruti Vilas Kadam
अनुष्का शेट्टीचे बालपणीचे एक जुने छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे. त्या काळातील तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि साधेपणा पाहून अनेक चाहते तिला ओळखू शकले नाहीत.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी अनुष्का शेट्टी योगा शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिने योगाबद्दल विशेष आवड असून त्याच शिस्तीने तिने अभिनय क्षेत्रात काम केले.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत अनुष्काने ‘शाहिबेगम’ म्हणून एक खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयातील गंभीरता आणि सौंदर्यामुळे ती सर्वांच्या मनात घर करून बसली आहेत.
अनुष्काने असा चित्रपट केला आहे ज्याने तब्बल 1000 कोटींचा आकडा पार केला. हा चित्रपट म्हणजे बाहुबली 1000 कोटींची कमाई करणारी ती पहिली अभिनेत्री आहे.
अनुष्काला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिने प्रत्येक भूमिकेला जीवंत केल्या असून दक्षिण सिनेमा जगतात तिचे मोठे नाव आहे.
अनुष्काचे खरे नाव ‘स्वीटी शेट्टी’ आहे. पण चित्रपटसृष्टीत तिने‘अनुष्का शेट्टी’ हे नाव ठेवले आणि याच नावाने ती आज घराघरात प्रसिद्ध आहे.
योगा शिक्षिका ते सुपरस्टार अभिनेत्री हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनुष्काने स्वतःची ओळख निर्माण केली असून त्या आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.