Shruti Vilas Kadam
लग्नाच्या आधी त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित फेशियल, क्लिनअप आणि हायड्रेशन न घेतल्यास त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसू शकते. त्यामुळे योग्य वेळेत स्किनकेअर सुरू करा.
लग्नाच्या काही दिवस आधी नवीन मेकअप, क्रीम किंवा सीरम वापरल्यास अॅलर्जी, पिंपल्स किंवा रॅश येऊ शकतात. त्वचेला सूट होणारे आणि सुरक्षित प्रॉडक्ट्सच वापरा.
लग्नाच्या तयारीत झोप आणि आहार विसरू नका. झोपेअभावी डोळ्याखाली डार्क सर्कल आणि त्वचेवर थकवा दिसतो. पोषक आहार आणि भरपूर पाणी प्या, त्यामुळे त्वचा नैसर्गिकपणे ग्लो करेल.
लेहेंगा किंवा साडीच्या रंगानुसार मेकअप आणि ज्वेलरी ठरवा. खूप जड मेकअप किंवा अयोग्य रंगसंगतीमुळे ब्राइडल लुक खराब होतो.
लग्नाच्या दिवशी नवीन मेकअप आर्टिस्ट किंवा हेअरस्टाईल न वापरता आधीच ट्रायल घ्या. त्यामुळे तुमच्यावर काय शोभते आणि काय नाही हे आधीच कळेल की लूक बिघडत नाही
कोरडी, तेटकट किंवा मिक्स, तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे जाणून त्यानुसार प्रॉडक्ट निवडा. चुकीचा बेस किंवा फाउंडेशन वापरल्यास मेकअप टिकत नाही आणि चेहरा तेलकट किंवा कोरडा दिसू शकतो.
लग्नाच्या दिवशी सर्व गोष्टी घाईघाईत केल्यास लुक खराब होतो. मेकअप, हेअर आणि ड्रेसिंगसाठी पुरेसा वेळ ठेवा. नियोजनबद्ध तयारीमुळे आत्मविश्वास आणि सौंदर्य दोन्ही खुलून दिसतात.