Shruti Vilas Kadam
रेशमाचा एक छोटा धागा जाळून पहा. खऱ्या रेशमाला जळताना केस जळल्यासारखा वास येतो आणि राख मऊ राहते. बनावट रेशम जळल्यावर प्लास्टिकसारखा वास येतो
खऱ्या रेशमात नैसर्गिक आणि हलकी चमक असते जी प्रकाशामुळे रंग बदलते. बनावट रेशमात हा फरक दिसत नाही.
खऱ्या रेशमाला स्पर्श केल्यावर तो थंड, गुळगुळीत आणि मऊ वाटतो. तो हातातून घसरतो आणि किंचित “कुरकुर” आवाज देतो. बनावट रेशम मात्र कडक, चिकट किंवा कृत्रिम वाटतो.
रेशमाचा एक कोपरा अंगठीमधून सरकवा. खरा रेशम सहज आणि मऊपणे सरकतो. बनावट रेशम मात्र अडकतो.
खरा रेशम तयार करणे खर्चिक असते, त्यामुळे तो स्वस्तात मिळणे शक्य नसते. खूप कमी किंमतीत ‘रेशम’ म्हणणारा कपडा बहुतेक बनावट असतो.
खऱ्या रेशमात प्रकाशाच्या कोनानुसार रंग बदलताना दिसतो. कधी हलका तर कधी गडद. बनावट रेशमात हा रंगबदल होत नाही तो एकसमान दिसतो.
खरे रेशम नैसर्गिक असल्याने शरीराला थंडावा देते. बनावट रेशमात हवा खेळती ठेवत नाही आणि तो शरीराला उष्ण वाटतो.