Shruti Vilas Kadam
रात्री मेकअप राहिल्याने त्वचेवरील पोर्ट्स (छिद्रे) बंद होतात. त्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि ब्लॅकहेड्स, पिंपल्स निर्माण होतात.
मेकअपमधील केमिकलमुळे त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते, यामुळे त्वचा कोरडी आणि खडबडीत दिसते.
रात्री मेकअप राहिल्यास त्वचेवरील मळ, धूळ आणि ऑईल जमा होऊन चेहरा दमलेला आणि थकलेला दिसतो. त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते.
मेकअप आणि घाम यांच्या मिश्रणामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढतात, यामुळे पिंपल्स, एक्ने आणि इन्फेक्शनचा धोका निर्माण होतो.
मस्कारा, आयलाइनर किंवा काजल काढले नाही तर डोळ्यांमध्ये जळजळ, लालसरपणा आणि सूज येऊ शकते. कधी कधी डोळ्यांचा इन्फेक्शनही होतो.
मेकअप न काढल्यास त्वचेवर डेड सेल्स साचतात, यामुळे लवकर सुरकुत्या आणि सूक्ष्म रेषा (fine lines) दिसू लागतात.
रात्री मेकअपसह झोपण्याची सवय दीर्घकाळ ठेवल्यास त्वचा निस्तेज, कोरडी आणि संवेदनशील बनते. त्यामुळे नियमित त्वचा-संभाळ करणे अत्यंत आवश्यक आहे.