Eye Care: तुम्हालाही रोज आयलाइनर लावायला आवडत? तर होऊ शकतात हे वाईट परिणाम, आजपासूनच घ्या काळजी

Shruti Vilas Kadam

डोळ्यांत जळजळ आणि लालसरपणा

दररोज आयलाइनर लावल्यानं त्यातील केमिकल्समुळे डोळ्यांत जळजळ, पाणी येणे किंवा लालसरपणा येऊ शकतो. विशेषतः संवेदनशील डोळ्यांच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.

Eye Care

डोळ्यांचा ओलावा कमी होतो

वॉटरलाइनवर वारंवार आयलाइनर लावल्यास डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि डोळे कोरडे पडतात. त्यामुळे थकवा जाणवतो.

Eye Care

संक्रमणाची शक्यता वाढते

आयलाइनरमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. नियमित वापराने हे बॅक्टेरिया डोळ्यांमध्ये जाऊन इन्फेक्शन, सूज किंवा पापणी फुंसी निर्माण करू शकतात.

Eye Care

छिद्रे बंद होणे

डोळ्याभोवतीच्या त्वचेवर वारंवार आयलाइनर लावल्यानं छिद्रे बंद होतात. त्यामुळे त्वचा नीट श्वास घेऊ शकत नाही आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळेही दिसू शकतात.

Eye Care

पापण्यांचे केस गळतात

आयलाइनर लावताना किंवा काढताना घासल्यामुळे पापण्या (eyelashes)गळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पापण्या विरळ दिसतात.

Eye Care

त्वचा कोरडी व सुरकुतलेली होते

आयलाइनरमधील काही रसायनं त्वचेचा ओलावा कमी करून लवकर सुरकुत्या आणू शकतात.

Eye Care

शेअर केल्याने संक्रमणाचा धोका

इतरांच्या आयलाइनरचा वापर केल्याने बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे आपला मेकअप प्रॉडक्ट नेहमी वेगळा ठेवा.

Eye Care

Tejpal Wagh: 'हा' मराठमोळा अभिनेता लढवणार नगरपालिकेची निवडणूक, दिली मोठी हिंट

Tejpal Wagh
येथे क्लिक करा