Tejpal Wagh: 'हा' मराठमोळा अभिनेता लढवणार नगरपालिकेची निवडणूक, दिली मोठी हिंट

Shruti Vilas Kadam

सोशल मीडियावरील हिंटमुळे चर्चा सुरू

प्रसिद्ध अभिनेता तेजपाल वाघ यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात त्यांनी लिहिलं “आता आपल्या वाईसाठी काहीतरी करायची वेळ आली आहे.” या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Tejpal Wagh

मूळ वाईचे रहिवासी

तेजपाल वाघ हे मूळचे वाई (जि. सातारा) येथील आहेत आणि तेथील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा उमेदवारीचा अंदाज वर्तवला जात आहे.

Tejpal Wagh

नगरपालिकेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबरला होईल. त्यामुळे वाघ यांच्या पोस्टची वेळ विशेष मानली जात आहे.

Tejpal Wagh

पक्ष

अद्याप तेजपाल वाघ यांनी कोणत्या पक्षातून निवडणुकीत उतरायचे आहे किंवा अपक्ष म्हणून लढणार का, याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही.

Tejpal Wagh

वाईच्या समस्यांकडे लक्ष वेधले

त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी वाई शहरातील स्थानिक समस्या आणि नागरिकांच्या अडचणी यांचा उल्लेख केला आहे. “ही लढाई कोणत्याही पक्षाविरुद्ध नसून, आपल्या प्रश्नांसाठी आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

Tejpal Wagh

‘आपल्या वाईला घडवूया’ असा संदेश

तेजपाल वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये नागरिकांना आवाहन केले आहे. “आपल्या वाईला आपण एकत्र मिळून घडवूया.” या भावनिक संदेशामुळे लोकांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे.

Tejpal Wagh

घोषणेच्या प्रतीक्षेत

सध्या वाघ यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी, त्यांच्या पोस्टमुळे ते लवकरच राजकारणात पाऊल ठेवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tejpal Wagh

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

Lehenga Selection
येथे क्लिक करा