Chaat Recipe  google
लाईफस्टाईल

10 Minute Recipe : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा चाट; बनवण्यासाठी लागतील अवघी १० मिनिटं

Chaat Recipe : मुलांना बाहेरचे चटकदार पदार्थ खायला आवडतात. पण ते त्यांच्या शरीरासाठी खूप घातक असू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलांना बाहेरचे चटकदार पदार्थ खायला आवडतात. पण ते त्यांच्या शरीरासाठी खूप घातक असू शकतात. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना चटकदार नमकीनसारखे पदार्थ घरच्याघरी तयार करून देऊ शकता. हे पदार्थ चहासोबत किंवा इतर वेळेस खाण्यासाठी एकदम मस्त असतात. शिवाय हे नमकीन अगदी झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊ रेसिपी.

नमकीन तयार करण्यासाठी साहित्य

२ बटाटे

तेल

शेंगदाणे

काजू

कढीपत्ता

मीठ

चाट मसाला

काळे मीठ

जिरेपूड

लाल तिखट

नमकीन चाट बनवण्याची कृती

सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्या. आता बटाटे सोलून काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. आता धुतलेले बटाटे कापून किंवा शेव सारखे किसून घ्या. याचा आकार थोडा जाडसर ठेवा.यानंतर सर्व काप पाण्यात ३ ते ४ वेळा धुवा. कुरकुरीत नमकीन बनवण्यासाठी हे काप दोन मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर सर्व काप सुती कापडाने पुसून घ्या.

आता कढईत तेल गरम करून सर्व बटाट्याचे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता त्याच गरम तेलात शेंगदाणे, काजू आणि कढीपत्ता तळून घ्या. यानंतर एका भांड्यात मीठ, चाट मसाला, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, दोन चमचे काश्मिरी तिखट घ्या. आता या भांड्यात कुरकुरीत बटाट्याचे मिक्स करा.

त्याच भांड्यात शेंगदाणे, काजू आणि कढीपत्ता घाला आणि सर्वकाही चांगले मिक्स करून घ्या. हे नमकीन चाखल्यानंतर तुम्ही बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्व नमकीनची चव विसराल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या नमकीनची चव आवडेल.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

Unique Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे 5 युनिक डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर उठून दिसतील

SCROLL FOR NEXT