Khajoor laddu : वाढत्या थंडीत मुलांना टिफीनमध्ये द्या 'हा' एक लाडू; शरीरातली वाढेल ऊर्जा

Winter Special : हिवाळ्यात शरीरात उबदारपणा राखणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही लहान मुलांना तसेच मोठ्यांसाठी काही पदार्थ खाणे खूप महत्वाचे असते.
Winter Special
Khajoor ladduyandex
Published On

खजूरमध्ये आढळणारे सर्व घटक तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात. या ड्रायफ्रूटमध्ये फायबर, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. पण हिवाळ्यात खजुराचे लाडू खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? चला मग जाणून घेऊ.

हिवाळ्यात खाणे आवश्यक आहे

हिवाळ्यात या ड्रायफ्रुटचे लाडू खाल्ल्याने तुम्ही तुमचे शरीर आतून उबदार ठेवू शकता कारण खजूरांचे स्वरूप उबदार असते. याशिवाय खजुराचे लाडू देखील तुमची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात. हिवाळ्यात पुन्हा-पुन्हा आजारी पडू नये म्हणून खजूरचे लाडू नियमितपणे खाणे सुरू करावे.

Winter Special
Amla Gud Chutney Recipe : गुळ-आवळ्याची चटणी थंडीत ठरेल फायदेशीर; नोट करा सिंपल रेसिपी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खजूराचे लाडू फायदेशीर मानले जातात. आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले हे लाडू तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. जर तुम्हाला सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर खजुराचे लाडू तुमच्या रोजच्या आहाराचा एक भाग बनवा. याशिवाय या ड्रायफ्रूटमध्ये आढळणारे घटक तुमच्या हृदयाचे आरोग्यही मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात.

आतड्याचे आरोग्य सुधारा

खजुराचे लाडू पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सेवन केले जाऊ शकतात. खजूराचे लाडू खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील लोहाची कमतरताही दूर करू शकता. जर तुम्हाला हिवाळ्यात उत्साही वाटायचे असेल तर दररोज नियमितपणे एक ते दोन खजूर लाडू खाणे सुरू करा.

Winter Special
Eye Care Tips : तुम्हाला दिवसभर लॅपटॉपवर काम करावं लागतं? मग अशी घ्या काळजी अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com