खजूर हे एक अत्यंत पौष्टिक ड्रायफ्रुट्स आहे आणि विशेषतः हिवाळ्यात त्याचे सेवन फायदेशीर ठरते. हिवाळ्यात खजुराचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायक फायदे होतात. खजुरात नैसर्गिक शर्करा आणि प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. हिवाळ्यात किमान दिवसाला एक खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा मिळते.खजुराचे विविध फायदे
खजुरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजे असतात. जी हाडांची मजबुती वाढवतात आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात. तसेच खजुरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येतो.
खजुरात व्हिटॅमिन A आणि बटा-कॅरोटिन असतात. ते दृष्टिच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांच्या देखभालीसाठी ते फायदेशीर ठरतात.
खजुरात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स, जसे की फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन C असतातजे शरीरातील इन्फेक्शन्सपासून संरक्षण करतात.चला तर जाणून घेवू हिवाळा स्पेशल खजुराचे लाडू रेसिपी.
खजुराचे पौष्टिक लाडू रेसिपी
साहित्य:
खजूर (डिंब) – १५-२०
गहू पीठ – १ वाटी
तूप – २ चमचा
ताजे खोबरे (किसलेले) – २ टेबलस्पून
बदाम – १०-१५
पिस्ता – ८-१०
वेलची पावडर – ½ चमचा
खारीक – ४-५ (इच्छेनुसार)
सूंठ पावडर – ¼ चमचा
कृती
सर्वप्रथम खजूर काढून त्यातल्या बिया काढा. नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करा.आता एका कढईत १ टेबलस्पून तूप गरम करा आणि त्यात गव्हाचे पीठ मिक्स करा. स्लोवर गॅस ५-६ मिनिटे भाजा. पिठाला सोनेरी रंग होईपर्यंत भाजा.भाजलेले पीठ जरा थंड होऊ द्या. नंतर त्यात खोबरे, बदाम, पिस्ता, वेलची पावडर, सूंठ पावडर आणि खजूरचे तुकडे मिक्स करा.
उरलेले १ टेबलस्पून तूप मिश्रणात अॅड करा आणि मिश्रण चांगले ठवळून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्यापासून लाडू वळायला घ्या .लाडू तयार झाल्यावर ते हिवाळ्यातील गोड पदार्थ म्हणून ताजे ताजे खा. हे लाडू शरीराला उब देणारे आणि शक्तिवर्धक आहेत.
टीप: तुम्ही यामध्ये अजून इतर मठा, सूंठ किंवा जिरे पावडर देखील टाकू शकता. खजूर आणि तूप या दोन्ही गोष्टी शरीराला आवश्यक चांगले फॅट्स पुरवतात, त्यामुळे हिवाळ्यात खजूराचे लाडू खाणे विशेषतः फायदेशीर ठरते.
Written By: Sakshi Jadhav