कोमल दामुद्रे
खजूरामध्ये अनेक पोषक तत्वे असतात, खजूर हे शरीरासाठी चांगले आहे.
खजूरामध्ये जीवनसत्वे, खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटाशियम, पोस्फोरास, मॅग्नीस, कॉपर आणि मॅग्निशिम यांसारखे तत्व असतात, जे आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी असतात.
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी खजूर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्याने त्याचा चांगला लाभ होतो
वजन वाढवायचे असल्यास खजूर हे खूप फायदेमंद ठरतात. खजूरामध्ये प्रोटीन, जीवनसत्त्व व नैसर्गिक साखर आढळते
संशोधनात असे आढळून आले आहे की, खजूर खाल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
खजूर रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
अशक्तपणा येणाऱ्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर आहे. खजूरामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असतात. खजूर खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे स्थर सुधारते.
खजूर रोज खाल्याने आपल्याला हाडांसंबंधी त्रास होणार नाही, यामुळे हाडे मजबूत होतात