Saam Tv
थंडीत तुम्ही उष्ण पदार्थांचं सेवन करणं शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यात असणारे महत्वाचे गुणधर्म तुम्हाला अनेक रोगांपासून वाचवतात. चला जाणून घेऊ त्याचे आश्यर्यकारक फायदे.
शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात, जे शरीराला थंड हवामानात गरम ठेवण्यास मदत करतात.
शेंगदाण्यांमध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयासाठी चांगले मानले जातात. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
शेंगदाण्यांमध्ये फायबर भरपूर असते. ज्यामुळे पाचन सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि फॉस्फरस असल्याने हाडे व सांधे मजबूत होतात.
शेंगदाण्यांमध्ये असलेल्या जीवनसत्त्व-ईमुळे त्वचा मुलायम आणि तेजस्वी राहते.
शेंगदाणे खाल्ल्याने लवकर पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
शेंगदाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व-बी भरपूर प्रमाणात असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
त्यातील (Vitamin B3) मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असून स्मरणशक्ती सुधारते.
शेंगदाण्यांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
शेंगदाणे कच्चे, भाजलेले किंवा चटणीसारख्या स्वरूपात खाल्ले जाऊ शकतात. हिवाळ्यात गुळ-शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यास अधिक फायदे होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.