Palak Paneer Saam TV
लाईफस्टाईल

Palak Paneer Recipe: रेस्टॉरंट स्टाइल पालक पनीर घरीच बनवता येणार; वाचा रेसिपी

Restaurant Style Palak Paneer Recipe in Marathi: पालकची भाजी नुसती खावी वाटत नाही. त्यामुळे त्याला पनीरची जोड आणि रेस्टॉरंट स्टाइल तडका असेल तर बातच और असते. त्यामुळे आज पालक पनीर घरीचं कसं बनवायचं हे जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील चमचमीच विविध पदार्थ खाणे सर्वांनाच आवडतं. मात्र जिभेचे चोचले पुरवताना खिशावरही भार पडतो. पालक पनीर अनेकांचं फेवरेट आहे. पालकची भाजी नुसती खावी वाटत नाही. त्यामुळे त्याला पनीरची जोड आणि रेस्टॉरंट स्टाइल तडका असेल तर बातच और असते. त्यामुळे आज पालक पनीर घरीचं कसं बनवायचं हे जाणून घेऊ.

साहित्य

  • पालक

  • पनीर

  • अद्रक

  • लसूण

  • पाणी

  • हिरव्या मिरच्या

  • तेल

  • बटर

  • जिरे

  • वेलची

  • दालचीनी

  • तेजपत्ता

  • बडिशेप

  • कांदा

  • टोमॅटो

कृती

सर्वात आधी पालकची पाने स्वस्छ धुवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी टाकून पालक उकळवून घ्या. एक उकळी आल्यावर लगेचच गॅस बंद करा आणि पालक थंड करण्यासाठी थेट बर्फाच्या पाण्यात टाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून पालकमध्ये एक इंच आलं, मोठ्या २ पाकळ्या लसूण आणि मिरची टाका. पालकसह हे सर्व एकत्रच मिक्सरला बारीक करून घ्या.

त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल आणि बटर टाकून पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करा. नंतर याच पॅनमध्ये जिरे, वेलची, दालचीनी, तेजपत्ता यांची कडक फोडणी द्या. या फोडणीत थोडी बडिशेप आणि कांदा मिक्स करा. त्यानंतर टोमॅटो अॅड करा. हे सर्व मिश्रण छान शिजल्यावर त्यात पावभाजी, सब्जी असे एव्हरेस्टचे मसाले मिक्स करा. तसेच पालकची ग्रेवी देखील मिक्स करून घ्या. तयार झाली तुमची पालक पनीर रेसिपी.

पालक पनीरची ही भाजी तुम्ही चारकोल ठेवून स्मोकी फ्लेवरमध्ये देखील बनवू शकता. गरमागरम पालक पनीर नान, पोळी, भाकरी, कुल्च्छा अशा सर्वांसह खाण्यासाठी चविष्ट लागतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

SCROLL FOR NEXT