ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तांदूळ आणि डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ, मूग डाळ आणि चना डाळ तीन तास भिजत ठेवा.
यानंतर तांदूळ आणि डाळीतील पाणी काढून टाकावे.
यानंतर भिजवलेल्या तांदूळ आणि डाळीत मिरच्या, लसूण, आलं, तेल, साखर, हळद, मीठ, सॅट्रिक अॅसिड टाकावे. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
या मिश्रणात गरजेनुसार पाणी टाका. हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे.
हे मिश्रण जास्त घट्ट आणि जास्त पातळदेखील नसावे.
यानंतर मिश्रणात सोडा टाकून फेटून घ्यावे. एका डब्यात हे मिश्रण ठेवून कूकरमध्ये ठेवावे. शिट्टी काढून कुकरला झाकण लावावे.
यानंतर ढोकळा शिजल्यानंतर त्यावर जिरे, मोहरी, हिंगची फोडणी द्या. त्यावर कोथिंबीर टाका.