ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांच्या घरी नाश्त्याला ब्रेड आणि पीनट बटर खातात.
पीनट बटर हे शरीरासाठी खूप हेल्दी असते.
पीनट बटरमध्ये विटामिन ई, प्रोटीन आणि फॅट्स असतात. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
शेंगदाण, मीठ, दालचिणी, मध
सर्वप्रथम शेंगदाणे भाजून ते पाखडून घ्या.
यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, मीठ, दालचिनीचे तुकडे टाकावेत.
यानंतर तुम्हाला गोड पीनट बटर हवं असेल तर त्यात मध टाका. मध टाकणे अनिवार्य नाही.
हे सर्व मिश्रण संपूर्ण बारीक होईपर्यंत वाटून घ्या.
हे वाटण क्रिमी होईल. त्यानंतर तुम्ही हे क्रिमी पीनट बटर बरणीत भरुन ठेवू शकता.