ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना गोड पदार्थ खायला खूप आवडतात. त्यात लाडू, मिठाई असे पदार्थ असतात.
गोड पदार्थांमध्ये लाडू हा सर्वांनाच आवडतो.
तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे लाडू खाल्ले असतील. त्यातील एक म्हणजे चन्याच्या डाळीचे लाडू.
चन्याच्या डाळीचे तुम्ही अतिशय सिंपल पद्धतीने लाडू बनवू शकतात.
त्यासाठी तुम्हाला चन्याची डाळ, तूप, पिठी साखर, वेलदोडा पावडर, काजू, बदाम आणि केसर हे पदार्थ आवश्यक आहे.
सर्वप्रथम २ तास चना डाळ भिजवून घ्या. ही डाळ मिक्सरला बारीक करा.
या पेस्टचे गोळे तूपात टाकून मस्त तळून घ्या.
तळलेला गोळे थंड झाल्यावर मोकळे करुन घ्या. त्यात पिठीसाखर, वेलदोडा पावडर, केसर, काजू, बदाम घालून लाडू वळून घ्या.
या लाडूवर तुम्ही ड्राय फ्रुट्स लावून मस्त सर्व्ह करा.