ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात खूप जास्त उकाडा असतो. त्यामुळे खूप गरम होते.
उन्हाळ्यात ज्यूस पिणे शरीरासाठी खूप चांगले असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
उन्हाळ्यात तुम्ही बनाना मिल्कशेक बनवू शकता. हा मिल्कशेक अगदी झटपट बनतो. त्याचसोबत तो पौष्टिक असतो.
बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी तुम्हाला केळी, मध, साखर, वेलची पूड, कच्चे दूध, बर्फ, ड्रायफ्रुट्स आवश्यक आहेत.
सर्वप्रथम तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात केळीचे बारीक तुकडे, मध आणि साखर घालून फिरवून घ्या.
यानंतर यात दूध, वेलची टाकून बारीक करुन घ्या.
या मिश्रणात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकू शकता. यानंतर तुम्ही मिल्कशेक पिऊ शकतात.
बनाना मिल्कशेक बनवताना नेहमी कच्चे दूध वापरावे.