ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थ खायचे असतात.
उन्हाळ्यात आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स प्यायला सर्वांनाच आवडते.
उन्हाळ्यात तुम्ही आंबा आणि अननसाची स्मूदी बनवू शकतात.
आंबा-अननसाची स्मूदी बनवण्यासाठी पिकलेला आंबा, अननस, संत्र्याचा रस, बर्फाचे तुकडे हे साहित्य आवश्यक आहे.
सर्वप्रथम तुम्ही पिकलेल्या आंब्याचा गर काढून घ्या. स्मूदी बनवण्यापूर्वी अर्धा तास आंब्याचा गर आणि अननसाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवा.
यानंतर मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, अननसाचे तुकडे, बर्फाचे तुकडे, संत्र्याचा रस मिसळा.
हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा.
हे मिश्रण तुम्ही ग्लासात काढून घ्या. यानंतर तुम्ही स्मूदी पिऊ शकता.