ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोमोज हा पदार्थ तरुणांना खूप जास्त आवडतो.
मोमोज हे शरीरासाठी पौष्टिक नसतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे मोमोजमध्ये मैदा वापरला जातो.
मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ वापरुन मोमोज बनवू शकता. जे शरीरालाठी चांगले असतात.
मोमोज बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, सोयाबीन, लसूण, मीठ, ब्रोकोली, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची हे साहित्य आवश्यक आहे.
सर्वप्रथम गव्हाच्या पिठात मीठ मिक्स करा. त्यात थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्या.
एका भांड्यात बारीक चिरलेला कोबी, कडधान्य,ब्रोकोली, आलं लसूण पेस्ट, मिरची, मीठ टाकून मिक्स करा.
मळलेल्या पिठाचे बारीक गोळे करुन घ्यावे. त्याच्या बारीक पुऱ्या लाटून त्यात हे भाज्यांचे मिश्रण भरावे.
यानंतर त्या पुऱ्यांना मोमोजचा आकार द्या. तुम्ही मोमोज तळून किंवा वाफवून खाऊ शकतात.