Colon Cancer: तोंडात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; आतड्यांच्या कॅन्सरशी असू शकतो संबंध

Colon cancer symptoms: हिरड्यांमधून रक्त येणं, तोंडाला दुर्गंधी येणं किंवा जिभेवर थर येणं ही केवळ तोंडाच्या समस्या नसून आतड्यांच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात. तज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Colon Cancer symptoms
Colon Cancer symptomssaam tv
Published On

गेल्या काही काळात कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. युकेसारख्या शहरात दर १२ मिनिटांनी एका व्यक्तीला आतड्याच्या कॅन्सरचं निदान होत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर या आजारामुळे दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंची संख्या १७,००० पर्यंत आहे. या कॅन्सरचं निदान सामान्यपणे पोटदुखी, अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या लक्षणांवरून करतात.

मात्र तुम्हाला माहितीये का दात किंवा हिरड्या यांच्या समस्याही काही संकेत देत असतात. तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जाऊन सूज निर्माण करू शकतात. यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका निर्माण होतो. दात व्यवस्थित न घासणं, फ्लॉस न करणं, धूम्रपान, जास्त प्रमाणात दारूचं सेवन, साखरेचं अधिक प्रमाण यामुळे बॅक्टेरियाचं संतुलन बिघडू लागतं.

Colon Cancer symptoms
Bottled water safety: बाटलीबंद पाणी किती दिवस सुरक्षित असतं? एक्सपायरी डेटमागचं खरं कारण जाणून घ्या

तोंडात आतड्यांच्या कॅन्सरचे कोणते संकेत दिसून येतात

हिरड्यांमधून रक्त येणं

हिरड्यांमधून रक्त येणं हे हिरड्यांच्या आजाराचं एक सामान्य लक्षण असतं. हे सूज आणि इन्फेक्शनचं लक्षण मानलं जातं. हार्वर्डच्या संशोधनानुसार, हिरड्यांचा आजार असलेल्या लोकांना मोठ्या आतड्यात कॅन्सरच्या पूर्वी दिसून येणाऱ्या गाठी होण्याचा धोका १७ ते २१ टक्क्यांनी जास्त असतो.

Colon Cancer symptoms
Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

तोंडाला दुर्गंधी येणं

सतत येणारी तोंडाची दुर्गंधी हे देखील एक लक्षण असू शकतं. याचा संबंध फ्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम नावाच्या बॅक्टेरियाशी असतो. हा बॅक्टेरिया हिरड्यांच्या आजारात तसंच मोठ्या आतड्याच्या कॅन्सरच्या गाठींमध्ये आढळतो. तो लाळेद्वारे किंवा रक्तपेशींद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो.

जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर येणं

जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर हा बॅक्टेरिया, घाण किंवा डेड सेल्स जमा झाल्यामुळे येतो. हे तोंडाच्या अस्वच्छतेचं, डिहायड्रेशनचं किंवा तोंड कोरडं पडण्याचं लक्षण देखील असू शकतं. संशोधनानुसार, काही प्रकारचे थर तोंडातील जीवाणूंमधील बदल दर्शवू शकतात.

Colon Cancer symptoms
Mumbai Air Pollution: कोरोनाहून भयंकर! वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला, मृत्यूंचा आकडा मोठा

दात पडणं

हार्वर्ड आणि एएसीआरनुसार, ज्या लोकांचे चार किंवा अधिक दात पडलेत, त्यांना मोठ्या आतड्यात कॅन्सरच्या अगोदर दिसून येणाऱ्या गाठींचा धोका २० टक्क्यांनी जास्त असतो. वेळेवर उपचार न केलेल्या हिरड्यांच्या आजारामुळे असं होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com