Mumbai Air Pollution: कोरोनाहून भयंकर! वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला, मृत्यूंचा आकडा मोठा

Air Pollution: मुंबईत प्रदुषण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे. प्रदुषणामुळे खूप जास्त त्रास होतो. प्रदुषणामुळे सर्वात जास्त मेंदूला त्रास होतो. त्यामुळे मेंदूचे आजार होतात. मुंबईत सर्वात जास्त मेंदूच्या विकाराचा धोका वाढला आहे.
Mumbai Air Pollution
Mumbai Air PollutionSaam Tv
Published On

Mumbai Air Pollution Side Effect:

सध्याचे जीवन खूप जास्त धावपळीचे आहे. त्यात जीवनशैली आणि वातावरणात सतत बदलत असतात. याचा सर्व परिणाम आपल्या शरीरावर होतो. लोक अनेक आजारांना बळी पडतात. आजारपणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रदुषण. प्रदुषणामुळे खूप जास्त त्रास होतो. प्रदुषणामुळे सर्वात जास्त मेंदूला त्रास होतो. त्यामुळे मेंदूचे ईजार होतात.

मुंबईत सर्वात जास्त मेंदूच्या विकाराचा धोका वाढला आहे. चुकीच्या सवयींंमुळे मेंदूचे विकार होतात. यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेन हॅमरेजमुळे रोज जवळपास सात जणांना जीव गमवावा लागत आहे. तर स्ट्रोकमुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागत आहे.

मुंबईमध्ये मेंदूच्या विकारांचे रुग्ण जास्त प्रमाणात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रदुषणापासून स्वतः ची काळजी घ्यायला हवी.

पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत २०२२ मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे २,५७३ तर ब्रेन स्ट्रोकमुळे २०१२ लोकांना जीव गमवावा लागला आहे. २०२१ च्या तुलनेत ही आकडेवारी तब्बल ८ टक्क्यांनी वाढली आहे. मेंदूच्या वाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने मेंदूच्या इतर भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही. यामुळे अर्धांगवायू होतो. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो.

Mumbai Air Pollution
Redmi New Smartphone : खिशाला परवडणारा अन् जबरदस्त फीचर्स, Redmi 13C लवकरच लॉन्च होणार

वाढते प्रदुषण हे ब्रेन हॅमरेजचे मुख्य कारण आहे. वातावरणातील धूळ, कण आपल्या शरीरात जातात. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे रक्तदाह वाढतो. रक्तदाब वाढल्याने रक्तवाहिनी फुटते आणि रक्तस्त्राव होतो. परिणामी नागरीकांना आपला जीव गमवावा लागतो.

यासाठी नागरीकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. नागरीकांनी घराबाहेर पडताना चेहऱ्याला स्कार्फ किंवा मास्कने झाकायला हवे. जेणेकरुन धूळ आणि विषाणू कण शरीरात जाणार नाहीत. तसेच कोणताही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Mumbai Air Pollution
'आरे'तील रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री, Green Toll भरुनच मिळणार प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com