स्मार्टफोनमध्ये Redmi कंपनीचे नाव अग्रेसर आहे. कंपनी नेहमीच नवीन स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी लवकरच Redmi 13C हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. याबाबत कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन ६ डिसेंबरला भारतात लाँच होणार आहे. याआधी हा स्मार्टफोन ग्लोबर मार्केट लाँच झाला आहे. जर तुम्हीही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर Redmi 13C हा एक चांगला पर्याय आहे.
फीचर्स (Features)
Redmi 13C हा या सीरीजचा पहिला 5G स्मार्टफोन असणार आहे. Redmi 13C जागतिक बाजारपेठेत तीन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB या प्रकारात उपलब्ध होणार आहे. जागतिक बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत १० हजार रुपये आहे.
Redmi 13C मध्ये 6.74 इंचचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 1600 × 720 पिक्सेल आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि ब्राइटनेस 450nits आहे.
या नवीन स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेटसह Mali G52 GPU वापरण्यात आला आहे. फोनमध्ये फोन 8 GB RAM + 256 GB अंतर्गत मेमरी देण्यात येऊ शकते.
Redmi 13C या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. तर 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 13C मध्ये 5000mAh बॅटरी आहे, ही बॅटरी 18W चार्जरसह येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.