Price Hike: कपडे, शूज ते कार-फ्रीज... १ एप्रिलपासून काय काय महागणार, वाचा संपूर्ण यादी

Price Hike From 1st April 2026: १ एप्रिलपासून काही नवीन नियम लागू होणार आहे. अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये वाहनांपासून ते एसीच्या किंमती वाढू शकतात.
Price Hike
Price HikeSaam Tv
Published On
Summary

१ एप्रिलपासून नवीन नियम

अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार

एसी, फ्रीज ते वाहनांच्या किंमती वाढणार

एप्रिल महिना सुरु होण्यासाठी अवघे १०-१२ दिवस राहिले आहेत. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. दरम्यान, नवीन आर्थिक वर्ष सर्वसामान्यांसाठी महागडं ठरणार असल्याचे दिसत आहे. अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. प्लास्टिक, रेझिन या कच्च्या मालाच्या किंमतीत अचानक वाढ झाली आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार आहे.

Price Hike
EPFO New Rule: EPFO कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ७ लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; कारण काय?

जागतिक स्तरावर युद्धामुळे मालवाहतूकीचे दर वाढणार आहे. त्यामुळेच कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. आता एप्रिल महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल क्षेत्रातील वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. या किंमती ५ ते १० टक्क्यांनी वाढू शकतात.

कंपन्यांना आता खर्च आणि बाजारपेठेच माल पोहचवण्यापर्यंत जास्त खर्च येतो. प्लास्टिक आणि पॉलिमरच्या किंमतीही वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादनांच्या किंमती वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर मालवाहतूकीचे दर ७ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच रुपयांची किंमत कमी झाल्याने आयात माल महाग झाला आहे.

वाहनांच्या किंमतीतही वाढ

वाहनांच्या किंमतीतदेखील वाढ होऊ शकते. मर्सिडीज बेंझ आणि ऑडी या कंपन्यांनी किंमतीत २ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहे. तर इतर कार उत्पादक कंपन्यादेखील २ ते ३ टक्क्यांनी वाढ करण्याच्या तयारीत आहे.

Price Hike
New Rule : कार, दुचाकी ट्रान्सफरसाठी आता NOC ची गरज नाही, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय, वाचा

घरगुती वस्तू महागणार

फक्त वाहने नाही तर घरगुती वस्तूदेखील महागणार असल्याचे दिसत आहे. टीव्ही, फ्रिज आणि एअर कंडिशनरमध्ये ५ ते ६ टक्क्यांची वाढ होऊ शकते. शूज आणि सिंथेटिक कपड्यांच्या किंमती ९ ते १० टक्क्यांनी वाढू शकतात.

Price Hike
Rule Change From 1st April: क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून 'हे' नियम बदलणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com