

कार ट्रान्सफरच्या नियमात बदल करणार
आता कार ट्रान्सफर करताना एनओसीची गरज नाही
नवीन नियमांसाठी सरकारकडे प्रस्ताव
जर तुम्हाला तुमची कार दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करायची असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. दुसऱ्या राज्यात जर वाहन ट्रान्सफर करायचे असेल तर एनओसी लागायची. आता एनोसीची गरज लागणार नाहीये, असं सांगण्यात येत आहे. आधी तुम्हाला नो ऑब्जेशन सर्टिफिकेट लागायचे. यासाठी सारखं आरटीओ ऑफिसला जावं लागायचं. यामध्ये खूप वेळ लागायचा. यावर आता महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
रिपोर्टनुसार, निती आयोगाच्या कमिटीने याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. दोन राज्यांमध्ये वाहन ट्रान्सफर करण्यासाठी NOCची गरज नाही लागली पाहिजे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या प्रस्तावावर विचार करत आहे. जर ही योजना लागू केली तर लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे. वाहन मालकांना जुन्या आरटीओकडून एनओसी घेण्याची आवश्यकता लागणार नाही. यामुळे वाहन ट्रान्सफरची प्रोसेसदेखील सोपी होईल.
कार ट्रान्सफरची प्रोसेस होणार सोपी (Car Transfer Process)
सध्या जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात वाहन नोंदणी करायची असेल तर अनेक कागदपत्रे सादर करावी लागते. सर्वात आधी राज्याकडून एनओसी मिळवावी लागते. यामुळे वाहनावर कोणतेही चलन नाही, असं समजते. त्यानंतरच नवीन राज्यात नोंदणी केली जाऊ शकते.
पोर्टलद्वारे ट्रान्सफर प्रक्रिया सोपी
समितीने सुचवले आहे की, वाहनाशी संबंधित सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. यामुळे देशभरातली सर्व वाहनांचा डेटा मिळतो.जर कारवर कोणतेही चलन असेल तर ते तपासणे सोपे होणार आहे. यामुळे स्वयंचलित ऑनलाइन क्लिअरन्स एनओसीची जागा घेऊ शकेल.
फिटनेस
समितीच्या म्हणण्याप्रमाणे फिटनेसचाही विचार केला आहे. वाहने चांगल्या स्थितीत आहेत का, हे चेक केले पाहिजे. नवीन नियमानुसार, जुन्या वाहनांचाही फिटनेस चेक केला जाईल. यामुळे ही वाहनेदेखील रस्त्यावर धावू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.