Akshay kumar car Accident: अक्षय कुमारच्या कारमुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर; भावाची खिलाडीकडे मोठी मागणी

Akshay Kumar Car Accident Update: सोमवारी रात्री अक्षय कुमारच्या गाडीला अपघात झाला, यामध्ये एका रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली. आता, ड्रायव्हरच्या भावाने अभिनेत्याकडे ही मोठी मागणी केली आहे.
Akshay Kumar Car Accident Update
Akshay Kumar Car Accident UpdateSaam Tv
Published On

Akshay kumar car Accident: सोमवारी मुंबईत अक्षय कुमारच्या गाडीचा अपघात झाला. अभिनेता आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना विमानतळावरून जुहू येथील घरी परतत असताना ही घटना घडली. या अपघातात एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्याच्या भावाचे निवेदन आता प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये चालकाच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर करत मागणी केली आहे.

ऑटो-रिक्षा चालकाचा भाऊ मदत मागतो

रिक्षा चालकाचा भाऊ मोहम्मद समीर यांनी एएनआयला सांगितले की, "ही घटना रात्री ८:००-८:३० च्या सुमारास घडली. माझा भाऊ रिक्षा चालवत होता तेव्हा अक्षय कुमारची इनोव्हा आणि एक मर्सिडीज त्याच्या मागे होती. जेव्हा मर्सिडीजने इनोव्हाला धडक दिली तेव्हा इनोव्हा रिक्षावर आदळली.

Akshay Kumar Car Accident Update
Marathi Movie: एक एन्ट्री… आणि सगळं बिघडलं! 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हास्यासोबत सस्पेन्सचा तडका

या धडकेमुळे माझा भाऊ आणि आणखी एक प्रवासी कारखाली अडकले. संपूर्ण रिक्षा उद्ध्वस्त झाली. माझ्या भावाची प्रकृती खूपच गंभीर आहे. माझी एकच विनंती आहे की माझ्या भावाला योग्य उपचार आणि रिक्षाच्या नुकसानीची भरपाई मिळावी. आम्हाला दुसरे काहीही नको आहे."

Akshay Kumar Car Accident Update
Border 2: 'बॉर्डर २'च्या शेवटी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज; धुरंधरची होणार जबरा एन्ट्री

अपघाताबद्दल पोलिसांनी काय म्हटले?

एनएनआयच्या मते, मुंबई पोलिसांनीही अपघाताची माहिती शेअर केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात दोन कार आणि ऑटो-रिक्षाच्या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची एस्कॉर्ट कार देखील सामील होती. जखमींना नंतर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या कार अपघातात अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com