Dhurandhar 2
Dhurandhar 2Saam Tv

Border 2: 'बॉर्डर २'च्या शेवटी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज; धुरंधरची होणार जबरा एन्ट्री

Dhurandhar 2: रणवीर सिंग अभिनीत 'धुरंधर' या चित्रपटाच्या यशानंतर, प्रेक्षक त्याच्या सिक्वेल 'धुरंधर २' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.'बॉर्डर २'च्या प्रदर्शनासोबत २३ जानेवारी रोजी 'धुरंधर २'चं सरप्राईज मिळणार आहे.
Published on

Border 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याचा भाग २ लवकरच प्रदर्शित होणार आहे. चाहते मार्चमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षक दुसऱ्या भागाबद्दलच्या अपडेट्सची जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि आता या चित्रपटाची एत धमाकेदार अपडेट समोर आली आहे.

बॉर्डर २ कधी प्रदर्शित होईल?

बॉलीवूड हंगामाच्या मते, 'बॉर्डर २'च्या प्रदर्शनात तुम्हाला धुरंधर २ ची झलक दिसेल. आदित्य धर यांनी 'धुरंधर 2' चा टीझर इडीट केला असून हा नवीन टीझर २३ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'बॉर्डर २' च्या प्रदर्शनासोबत दाखवला जाईल.

Dhurandhar 2
Film Festival: ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात होणार सन्मान

धुरंधर २ च्या निर्मात्यांचा प्लॅन

'बॉर्डर २' मध्ये सनी देओल, दिलजीत दोसांझ, वरुण धवन, अहान शेट्टी आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत असतील. वृत्तानुसार, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना रिलीजची तारीख पुन्हा एकदा कळावी यासाठी हा टिझर आहे. 'धुरंधर २' २०२६ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे आणि काही नवीन सीनसह हा टीझर ही तारीख पुन्हा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. सूत्राने पुढे म्हटले आहे की, "धुरंधर २ आणि बॉर्डर २ हे दोन्ही देशभक्तीपर चित्रपट आहेत आणि जिओ स्टुडिओची टीम देशभक्तीपर चित्रपटांच्या जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Dhurandhar 2
Shefali Jariwala: काळ्या जादूमुळे झाला शेफाली जरीवालाचा मृत्यू...; पती पराग त्यागीचा धक्कादायक खुलासा

धुरंधर २ कधी प्रदर्शित होईल?

धुरंधर २ चा ट्रेलर फेब्रुवारीच्या अखेरीस प्रदर्शित होईल. 'धुरंधर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाशी स्पर्धा करेल. हे दोन्ही चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहेत. धुरंधरच्या यशानंतर आता धुरंधर २ कसा असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com