Film Festival: ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात होणार सन्मान

Film Festival: ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा यांना अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पद्मपाणि पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात त्यांचा सन्मान होणार आहे.
Padma Pani Award has announced to senior Indian musician Padmavibhushan Ilayaraja
Padma Pani Award has announced to senior Indian musician Padmavibhushan IlayarajaSaam Tv
Published On

Film Festival: भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या घोषणेमुळे चित्रपट व संगीत क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. महोत्सव उद्घाटन समारंभात, बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस हा महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होईल.

Padma Pani Award has announced to senior Indian musician Padmavibhushan Ilayaraja
Rajkummar Rao-Patralekha: आमच्या बाळाचं नाव काय? राजकुमार राव-पत्रलेखाने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम आणि मानद अध्यक्ष दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी इलयाराजा यांच्या निवडीची घोषणा केली. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर होत्या, तर सदस्य म्हणून आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी काम पाहिले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे आहे.

Padma Pani Award has announced to senior Indian musician Padmavibhushan Ilayaraja
A.R Rahman: 'मला कधीही कोणालाही दुखवायचं...'; ए.आर. रहमान यांनी बॉलिवुड 'धार्मिक राजकारण' वादावर दिलं स्पष्टीकरण

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७ हजारांहून अधिक गाणी आणि १५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी अशा विविध भाषांतील त्यांची संगीतरचना आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्त्य सिम्फनी यांचा सुरेख संगम ही त्यांची खास ओळख आहे. ‘इसैग्नानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलयाराजा यांच्या संगीत साधनेला हा पुरस्कार अर्पण करण्यात येणार आहे. या महोत्सवात देश-विदेशातील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com