Chhatrapati Shivaji Maharaj: उत्खननात सापडल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या दुर्मिळ वस्तू

Surabhi Jayashree Jagdish

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक ऐतिहासिक वस्तू महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर झालेल्या पुरातत्व उत्खननात सापडल्या आहेत. विशेषतः रायगड किल्ल्यावर झालेल्या उत्खननात ३५० वर्षांपूर्वीच्या अनेक दुर्मिळ वस्तू सापडल्या आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj

उत्खननात सापडल्या गोष्टी

त्या काळातील विज्ञान, युद्धतंत्र आणि दैनंदिन जीवनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. या वस्तूंमध्ये यंत्रराज, नाणी, शस्त्रं आणि धार्मिक मूर्ती यांचा समावेश आहे.

Raigad Fort excavation

शिवकालीन गणेश मूर्ती

उत्खननात शिवाजी महाराजांच्या काळातील गणेशाची एक प्राचीन मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती त्या काळातील धार्मिक श्रद्धा आणि मंदिर संस्कृतीचं प्रतीक मानली जातेय. इतिहासकारांच्या मते अशा मूर्ती गडांवरील देवस्थानांमध्ये स्थापित केल्या जात असत.

Shivaji era artifacts

यंत्रराज

रायगड किल्ल्यावर उत्खननात यंत्रराज नावाचं प्राचीन खगोलशास्त्रीय साधन सापडलं. हे तांबे-कांस्य धातूपासून बनलेलं असून त्यावर संस्कृत आणि देवनागरी लिपीतील अक्षरं कोरलेली आहेत.

Maratha empire history

शिवकालीन तलवारी

शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक तलवारी आजही संग्रहालयांमध्ये जतन केल्या आहेत. या तलवारींची रचना युद्धासाठी अत्यंत मजबूत आणि प्रभावी होती. मराठा सैनिकांच्या युद्धतंत्राचं आणि शस्त्रकलेचं हे महत्त्वाचं उदाहरण मानलं जातं.

archaeological discoveries india

पत्रव्यवहार

उत्खननात शिवाजी महाराजांच्या काळातील काही पत्रांचे नमुनेही आढळले आहेत. या पत्रांवर ‘शिवमुद्रा’ असल्यामुळे ते प्रशासनिक व्यवहारासाठी वापरले जात होते याची माहिती मिळते.

Indian archaeological findings

शिवरायांच्या काळातील नाणी

शिवाजी महाराजांनी चलन म्हणून शिवराई नावाची नाणी होती. उत्खननात सापडलेली ही नाणी मराठा साम्राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचे पुरावे मानली जातात. या नाण्यांवर विशेष चिन्हं आणि अक्षरे कोरलेली असतात.

Shivaji Maharaj coins

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा