

केडीएमसी मुख्यालय समोर एका तरुणाला बेदम मारहाण झाली.
पादचारी तरुणाचा एका तरुणीसोबत झाला वाद
कुणाल साळवे हा तरुण तरुणीसोबत वाद घालणाऱ्या तरुणाचा मित्र असल्याचा संशयावर केली बेदम मारहाण
विनाकारण एका तरुणाला मारहाण केल्याने एकच खळबळ
बाजारपेठ पोलिसांनी सुरू केला तपास
आजारातून बरे झाल्यानंतर शरद पवार सक्रिय
बारामतीत विद्या प्रतिष्ठानची घेतली बैठक
विद्या प्रतिष्ठान’च्या विश्वस्त समितीच्या बैठकीला उपस्थित
यावेळी पवारांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही केल्या.
कोल्हापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावली
ढगांच्या गडबडाटासह जोरदार वारा आणि गारांसहित पावसाची हजेरी
कसबा बावडा परिसरात मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस
उन्हानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा
ठाण्यात चैत्र नवरात उत्सवानिमित्त आयोजित उत्सवाची आज पासून सुरुवात झाली आहे. ठाण्यातील कोपरी परिसरात आयोजित नवरात्र उत्सवाच्या देवीचे आगमन कोपरी येथे झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पत्नी लता शिंदे आणि नातू रुद्राक्ष यांनी देवीचा रथ खेचून देवीची मिरवणूक सुरू झाली आहे
ठाण्यातील घोडबंदर रोड मुल्ला बाग या ठिकाणी सेंट्रॉप इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागली आहे. पालिकेचे अग्निशमन दल पोहचले आहे. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.
अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठा समस्येबाबत आज मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या बैठकीला अंबरनाथमधील नगरसेवक उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरामध्ये आज जोरदार पाऊस कोसळला. सुमारे एक तास झालेल्या या अवकाळी पावसामुळे गाव परिसरात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रायगड रोहा येथील ट्रान्सवर्ड फर्टिकेम कंपनीमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. कंपनीतील कूलिंग टॉवरला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धाटाव MIDC येथील अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पुढील तपास सुरू आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ताहाराबाद, मुल्हेर, अंतापूर आणि जायखेडा परिसरात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ताहाराबाद येथे छोट्या आकाराच्या गाराही पडल्या. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे तसेच उन्हाळी कांद्याच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
महागाव तालुक्यातील विविध हॉटेल व रेस्टॉरंटवर भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. काल ३३ सिलेंडर जप्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू ठेवत पुरवठा विभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग ॲक्शन मोडमध्ये दिसून आले. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून हॉटेल व्यावसायिकांवर प्रशासनाची कडक नजर आहे.
पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. सध्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विशेषतः आदिवासी भागातील शेतकरी चिंतेत असून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात झालेल्या गारपीटीमुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन कापणीच्या तोंडाशी आलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. उद्या गुढी पाडव्याच्या सणाआधीच शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात असून मदतीची मागणी होत आहे.
पुण्यात बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. दुपारी २.१३ वाजता आलेल्या मेलमध्ये सायनाईड गॅसयुक्त बॉम्ब ठेवले असल्याचा दावा करण्यात आला होता. तातडीने पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने तपास केला असता कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. हा मेल अफवा पसरवण्यासाठी पाठवण्यात आल्याचे समोर आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
यवतमाळच्या महागाव तालुक्यात विविध हॉटेल,रेस्टॉरंट धाडीत घरगुती 13 सिलेंडर जप्त
दुसऱ्या दिवशी भरारी पथकाची कारवाई, पुरवठा विभाग, महसूल प्रशासन, पोलीस विभाग ॲक्शन मोडवर
यवतमाळच्या महागाव शहरासह परिसरात हॉटेल रेस्टॉरंट मधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका जालन्यातील स्टील उद्योगाला बसतो आहे. स्क्रॅपच्या दरामध्ये वाढ झाल्याने बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सळईच्या दरात पाच ते सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जहाजांद्वारे देशात येणाऱ्या स्क्रॅपची आवक थांबली आहे.याचा फटका जालन्यातील स्टील उद्योगाला बसत आहे. स्टील उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्चामाल अर्थात भंगारच्या दरामध्ये वाढ झाल्याने बांधकामासाठी वापरण्यात येणारी सळईच्या दरात देखील वाढ झाली आहे.
परभणीच्या नरळद गावातील चंदाबाई यादव काळे यांच्या शेतातील ज्वारी मध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती ज्याची माहिती मिळताच परभणीच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकली आणि अवैद्य रित्या लागवड केलेला 9 लाख २६ हजार ३०० रुपयांचा 42 किलो गांजा जप्त केला आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चंदाबाई यादव काळे यांच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड पोलिसांनी जलद कारवाई करत केबल चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. उत्तर प्रदेशातील एका आंतरराज्य टोळीने एलबीएस रोडवर एमटीएनएलच्या केबल्स चोरण्याचा कट रचला होता. गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करून ९ आरोपींना अटक केली तसेच एक आयशर ट्रक आणि चोरीसाठी वापरण्यात येणारी साधने जप्त केली.
सांगोल्यातील सांगोला शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतून दहावीच्या भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून काल दिवसभर पोलिसांनी सखोल तपास केला. तपासादरम्यान महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून प्रकरणातील इतर बाबींचीही छाननी केली जात आहे.
- बलात्कार प्रकरणी अशोक खरात याला काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी केली होती अटक
- आज कॅप्टन खरातला पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने 24 तारखेपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
- अशोक खरात ज्योतिष तज्ञ म्हणून प्रसिद्ध
- अनेक राजकीय नेत्यांसह महत्त्वाचे लोक खरात यांच्याकडे ज्योतिष पाहायला जायचे
- अनेक राजकीय नेत्यांसोबत खरात याचे घनिष्ठ संबंध
- अशोक खरात याच्या सिन्नर परिसरात असलेल्या एका मंदिरावर रूपाली चाकणकर सुद्धा आहेत सदस्य
गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात येते. त्यानिमित्त अमरावती शहरात बाजारपेठा फुलून गेल्या असून, आकाराला लहान व दिसायला सुंदर असलेल्या रेडीमेड गुढीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.गुढीसाठी लागणार्या नव्या काठीसह रेशमी-तलम वस्त्र, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठींची खरेदी सुरू झाली आहे. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडीमेड गुढीविक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकाची पसंती बाजारात दिसून येत आहे. लहान, पण दिसायला सुंदर असलेल्या रेडीमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे.
सांगली जिल्हा परिषदेतल्या महाविकास आघाडीच्या विजयानंतर आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्ते आले समोरा-समोर
गोपीचंद पडळकर बाहेर येताच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी
जयंत पाटलांच्या विजयाबरोबर आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अशी घोषणाबाजी
आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यासमोरच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी
जयंत पाटील समर्थकांकडुन झालेल्या घोषणेनंतर पडळकर समर्थक देखील आक्रमक
पडळकर समर्थकांकडून देखील जोरदार घोषणाबाजी करत देण्यात आले प्रत्युत्तर
पडळकर व पाटील समर्थकांकडुन देण्यात आलेल्या घोषणामुळे वातावरण बनला तणावपूर्ण
पोलिसांकडून पडळकर समर्थकांना बाजूला करत ,पडळकरांना निघून जाण्याची केली विनंती
पोलिसांची सतर्कता आणि सुरक्षा व्यवस्था मुळे टळला मोठा अनर्थ
- सोलापुरातील महापौर नगरसेवक आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून मराठा समाजात फूट
- सकल मराठा समाजाकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम होणार असल्याने मराठा क्रांती मोर्चाचा विरोध
- पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भाजप मधील मराठा समाजाच्या नवीन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार असल्याने करण्यात येत आहे विरोध.
- सोलापुरातील चार पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चा कडून माऊली पवार यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडो मारून केला निषेध
- पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा समाजावर सोलापूर महानगरपालिका महापौर आणि सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून अन्याय केल्याची मराठा क्रांती मोर्चाची भावना
आखाती देशांतील युद्धामुळे घरगुती आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यातील तणावामुळे गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत घरगुती गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. घरगुती गॅसचा साठा करून किंवा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिला आहे. तसेच, अशा प्रकारांमध्ये आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर पावले उचलली जातील, वेळप्रसंगी मकोका लावण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थान राज्यातून जाणाऱ्या दिल्ली - मुंबई महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे पिंपरी चिंचवड शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. तीन फॉर्च्यूनर कार घेऊन 27 तारखेला पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी परराज्यात गेला होता या ग्रुपमध्ये थेरगाव, वाकड आणि महाळुंगे येथील तरुणांचा समावेश आहे. या तीन आलिशान फॉर्च्यूनर कार पैकी एका फॉर्च्यूनर कारला आज सकाळी मुंबई - दिल्ली महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
सांगली जिल्हा परिषदेत भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता
महायुती आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेत दाखल
महायुतीच्या सदस्यांना घेऊन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा परिषदेत दाखल
आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार विश्वजीत कदम माजी आमदार मानसिंगराव नाईक विक्रम सावंत यांच्यासह महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार सदस्य झाले दाखल
महाविकास आघाडीच्या संगीता पाटील आणि भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांच्यात अध्यक्ष पदासाठी
उपाध्यक्षपदासाठी महायुतीचे हिम्मत जाधव व महाविकास आघाडीचे ऋषिकेश लाड यांच्यात होणार लढत.
महाविकास आघाडीचे 36 सदस्य संख्या झाल्याचा दावा
सोलापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून अर्ज दाखल
अध्यक्ष पदासाठी बार्शी तालुक्यातील दीपक वैद्य तर उपाध्यक्ष पदासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील इंद्रजित पवार यांना भाजपकडून संधी
दोन्ही पदासाठी भाजपकडून प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध होणार
सोलापूर जिल्हापरिषदेच्या 68 पैकी 38 जागावर भाजपचे सदस्य निवडून आल्याने भाजपकडे एकहाती सत्ता आहे
दरम्यान अत्यंत साध्या कुटुंबातील शेतकऱऱ्याच्या मुलाला पक्षाने अध्यक्ष पदाची संधी दिलीय त्याबद्दल आभार असे मत अध्यक्ष दीपक वैद्य मांडले
तर मागील 28 वर्षांपासून पक्षासाठी एकनिष्ठपने काम केलेल्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिलीय यांचा मनस्वी आनंद असल्याची भावना उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी व्यक्त केली
दरम्यान आज दुपारी 2 वाजता सोलापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीची औपचारिकता पार पडणार आहे
लातूर जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा प्रचंड मोठं नुकसान झालं आहे, लातूरच्या चाकूर, औसा, निलंगा, उदगीर या भागात ज्वारी, गहू, हरभरा यासह आंबा आणि द्राक्ष फळबागेला मोठे नुकसान झालं आहे
पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई - बेंगलोर महामार्गावर दोन ट्रेलर ट्रकचा अपघात झाला आहे. मुंबई बेंगलोर महामार्गावर सयाजी हॉटेल समोर एका ट्रेलर ट्रकला दुसरा ट्रेलर ट्रक ने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या अपघातात एका ट्रेलर ट्रक ड्रायव्हर जखमी झाला आहे
इराण इजराइल अमेरिका युद्धाचा परिणाम आपल्या देशावर देखील झाला आहे. या युद्धामुळे एलपीजी गॅसचे शॉर्टेज निर्माण झाल्याने या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे वाढ होत असताना मात्र शहरातील वेगवेगळ्या एलपीजी पंपावर वेगवेगळे दर पहावयास मिळत आहे कोठे 85 रुपये लिटर तर कोठे 97 रुपये तर कोठे 89 रुपये लिटर एलपीजी गॅस मिळत आहे 58 रुपये लिटर असलेला एलपीजी गॅस चक्क दुपटीने वाढ झाल्याने ऑटो चालक मात्र आता प्रचंड संतापले आहेत.
एकदम एवढी वाढ झाल्यामुळे भाडेवाढ मात्र ऑटो चालकांना करता येत नाही त्याचबरोबर शहरातील वेगवेगळ्या पंपावर वेगवेगळे दर असल्याने देखील ऑटो चालकांमध्ये चांगलाच संताप निर्माण झाला आहे दोन दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याविषयी माहिती देखील दिली होती पण काहीच तोडगा न निघाल्याने आज शहरातील सर्व ऑटोचालकांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील परीक्षा केंद्रासाठी असणाऱ्या दहावीच्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशाला या ठिकाणी बोर्ड कस्टडीमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. सोमवारी रात्री चोरट्यांनी भूगोलाचे पेपर चे ५० गठ्ठे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने या घटनेची दखल घेत शाळेचे मुख्याधापक, गट शिक्षण अधिकारी आणि यांना निलंबित करण्यात आलं आहे. शाळेत सुरू असलेल्या अंतर्गत कलह असल्याने शाळेतून च हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
20 मार्च पर्यंत अशीच परिस्थिती राहणार
दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता
उष्णतेचा पारा 40 अंशाच्या खाली
बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, मराठी नवीन वर्ष्याच्या स्वागताला अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीय
सध्या 42 अंशावर पोहोचलेला उष्णतेचा पारा 40 अंशाच्या खाली आला
पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
वढू तुळापूरमध्ये धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकस्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यामुळे परिसरात भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांची बैठक
दुपारी 12 पर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करायचे आहे
सूत्रांच्या माहितीनुसार सोलापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी दीपक वैद्य तर उपाध्यक्ष म्हणून इंद्रजित पवार यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती
दीपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य असून माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे निकटवर्तीय आहेत
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वखाली बार्शी तालुक्यात 6 पैकी 6 जिल्हा परिषद गटावर भाजपचे सदस्य निवडून आलेत
त्यामुळे भाजपने अध्यक्ष पदाची संधी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाला दिलीय
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांनी भरला अध्यक्षपदाचा अर्ज
संगीता पाटील या वाळवा तालुक्यातल्या कासेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य आणि आमदार जयंत पाटील यांच्या नातेवाईक
उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या ऋषिकेश पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
ऋषिकेश लाड पलूस तालुक्यातल्या कुंडल जिल्हा परिषद गटाचे सदस्य व आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे
भाजपाकडुन स्वप्नाली मासाळ यांनी दाखल केला उमेदवार अर्ज
स्वप्नीला मासळ जत तालुक्यातील डफळापूर जिल्हा परिषद गटाचा सदस्य
तर उपाध्यक्ष पदासाठी कामेरी गटाचे जयराज पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
राज्यसभेच्या ३७ सदस्यांचा आज कार्यकाळ संपला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो. राज्यसभेतील प्रत्येक खासदाराचे योगदान असते. रामदास आठवले सदाबहार नेते आहेत.
जालन्यात ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसतोय.ढगाळ वातावरणामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. जालन्यातील धाकलगाव येथील शेतकरी इंदुबाई जगन्नाथ नाझरकर यांच्या आंबा पिकाची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.आंबा फळगळीमुळे आंब्याच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात आज हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. तसेच श्री क्षेत्र तुळापूर येथील बलिदानस्थळी जावून अभिवादन केले.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, वढू.बु. चे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक संरपच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.
- व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आता कोळशाच्या भट्ट्यांवर पर्याय निवडला आहे.. त्यामुळे कोळशाच्या आणि लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ झाली आहेय...
- त्यामुळे लाकडी कांड्या आणि कोळशाच्या मागणीत आता छोटे ठेले लावणारे यासोबतच केटर्स चालक यांच्याकडून इंधनासाठी मागनी केली जात आहे...
हिंगोलीत चोरट्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून तीन गॅस सिलेंडरची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर जिल्हा परिषद शाळेमध्ये गॅस सिलेंडरची चोरी करण्यात आली आहे, याप्रकरणी आता शाळेच्या मुख्याध्यापकांनी बाळापुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजवण्यासाठी गॅसचा पुरवठा करण्यात येतो मात्र सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याने अनेकांना गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावं लागत आहे आणि याचाच फायदा उचलत चोरट्यांनी चक्क शाळेतून सिलेंडर पळवले आहेत, जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाक घरातून चोरट्यांनी भारत व इंडेन कंपनीचे सिलेंडर चोरले आहेत, गॅस सिलेंडरच्या या चोरीमुळे पोलिसांच्या डोक्याला मात्र भलताच ताप झाला आहे, सिलेंडर चोरीच्या या प्रकारानंतर शाळेतील गुरुजींवर लाकडे जमा करून स्वयंपाक व्यवस्था करण्याची वेळ आली आहे
मजान ईद आणि गुढी पाडवा सणाच्या निमित्ताने पंढरपूर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांनी रूट मार्च काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रूक्मिणी मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड या भागात पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले.
चैत्र वारी तोंडावर असताना पंढरपुरात हॉटेल चालकाना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेनात. त्यामुळे चैत्र वारीत भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. इथे आलेला भाविक चहा, नाष्टा आणि जेवणासाठी हॉटेल मध्ये जातो. पंढरपूर मध्ये मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीवर चालणारी 50 हॉटेल्स आहेत.
मागील काही दिवसापासून या हॉटेल चालकाना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र थांबा आणि वाट पहा एवढंच सरकारी उत्तर त्यांना मिळाले आहे.
नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोनहल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ
खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन आणि कोराडी थर्मल पावर स्टेशनला ला धमकीचे ई-मेल
ड्रोनद्वारे सायनाइड हल्ल्याची धमकी ई-मेलमधून देण्यात आल्याची माहिती आहे...
खापरखेडा केंद्राची BDDS कडून सखोल तपासणी, काहीही संशयास्पद आढळले नाही
कोराडी वीजकेंद्राचीही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू
तामिळनाडूतून ई-मेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती
पोलिस उपायुक्त डॉ.संदीप पाखाले यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी
सांगली जिल्ह्यात मिरज पूर्व भागात काल वादळी वाऱ्यासह गारांचा प्रचंड पाऊस पडला.. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. मिरज बेडग रोड वरील शाळूचे पीक अक्षरश भुईसपाट झाले आहे..त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..
जालन्यात दारूच्या नशेत असलेल्या पतीने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून पती आकाश उद्धव गिराम याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कर्मचारी या जालना पोलीस दलात आरसीपी प्लाटूनमध्ये नोकरी करतात. त्यांच्या पतीने त्या राहत असलेल्या पोलीस क्वार्टर येथे दारूच्या नशेत शिवीगाळ करून रॉडने या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
गॅस बुकिंग च्या नावाखाली हे सायबर चोरटे सध्या अनेक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल डाऊनलोड करायला भाग पाडत आहे
एपीके फाइलमधून बुकिंग करा असं आम्हीच दाखवत लाखो रुपये उकळत आहेत
यावर आता पुणे पोलिसांनी थेट एक व्हिडिओ तयार करत पुणेकरांना आवाहन केलं आहे
कुठलाही नंबर वरून जर तुम्हाला फोन आला आणि गॅस बुकिंग साठी एपीके फाईल डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं तर ती कृपया करून करू नये.
सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गेले दोन वर्ष सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवा बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटनावर होत होता. मात्र आता या शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असून मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान दररोज विमान उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी उलाढाल वाढण्यास तसेच सण-उत्सवांच्या काळात चाकरमान्यांना आता वेळेत कोकणात येता येणार आहे.
धाराशिवच्या लोहारा येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका
गारपिटीमुळे कलिंगड व द्राक्ष बागेच मोठ नुकसान
गारांचा मोठा पाऊस झाल्याची शेतकऱ्याची माहिती
काढणीला आलेले कलिंगड गारपिटीच्या तडाख्यात,शेतकऱ्याचं मोठं नुकसान
गारपिटीमुळे कलिंगडाला तडे, मार लागल्याने आत मध्येही कलिंगड डॅमेज जाग्यावरच सडतील
गारपिटीच्या तडाख्यातील कलिंगड खाण्यासाठी काढता येणार नाही, आतून नासतील शेतकऱ्याने सांगितलं
सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी,शेतकऱ्यांची मागणी
दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत
नागपूर विभागातून १२वीत २७ तर १०वीत १६ कॉपी प्रकरणे उघड
पेपर लीक आणि परीक्षा केंद्रांवरील कॉपी करणारे विद्यार्थी कारवाईच्या कक्षेत
एक ते तीन वेळा परीक्षा देण्यास बंदीची शक्यता कारवाई नंतर होणार स्पष्ट..
सुनावणीनंतर तज्ज्ञ समितीकडून कारवाई संदर्भात अंतिम निर्णय होणार
परभणी शहरातील एलपीजी धारक ऑटो चालकांनी संप पुकारला आहे.
परभणी शहरात असलेल्या गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीने गॅसचे दर ठरवले जात आहेत
दिवसदिवस मोठ्या प्रमाणावर वाढवले जात असल्याचा आरोप ऑटो चालकाने केला आहे
शहारत 15 दिवसापूर्वी 58 दर होता आणि आता प्रत्येक lpg गॅस पंप वर वेगळे दर पहिला मिळत आहे कुठे 97 रुपये लिटर तर कुठे 89 रुपये लिटर भाव देत आहेत त्यामुळे ऑटो चालक
आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
आज नागपूर सह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण
गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा दिलेला इशारा फोल ठरल्यानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
सध्या नागपूरसह विदर्भात उन्हाचे चटके बसत असताना पुढचे दोन दिवस वादळी पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे
18, 19 तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
अवकाळी पाऊस आलाच तर गर्मीने त्रस्त नागरिकांना काही अंशी मिळणार दिलासा
मंगळवारी वातावरणात बदल होऊन विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान 40 अंशाच्या खाली आलं
जिल्हा परिषद शाळेतून चक्क सिलेंडर चोरीला
चोरट्यानी सिलेंडर चोरले
हिंगोली च्या कळमनुरी तालुक्यातील सुकळीविर गावच्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस स्थानकात सिलेंडर चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
तीन सिलेंडर चोरून नेल्याप्रकरणी बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
मावळ तालुक्यात सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसत असून, अनेक हॉटेल्समध्ये आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅसअभावी हॉटेल व्यवसाय चालवणे कठीण झाले असले तरी, कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन व्यवसायिकांनी “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे पाणी आल्यामुळे गहू,बाजरी, मिरची यांच्यावर पाणी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तर एकीकडे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
जळगाव पाटबंधारे विभागाकडून जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, सुकी, तोंडापूर व बहुळा प्रकल्पांमधून औद्योगिक व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. यात जळगाव महापालिका शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याची उचल करते. यात गेल्या काही वर्षापासून महापालिकेकडून पाणीपट्टीची थकबाकी थोडी थोडी भरली जात आहे. परंतु जलसंपदा विभागाकडे तब्बल १४ कोटीच्या वर ही रक्कम गेली असल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला २७ मार्चपर्यंत पाणीपट्टीची थकीत रक्कम भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. थकीत रक्कम मुदतीत न भरल्यास धरणातून पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा दिला आहे. यामुळे नागरिक व उद्योगांना होणाऱ्या गैरसोयीची जबाबदारी महापालिकेवर राहिल, असे पाटबंधारा विभागाने सूचित केले आहे.
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक
पुणे जिल्हा परिषदेला चार वर्षानंतर मिळणार कारभारी
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या विशेष सभेत त निवडणूक प्रक्रिया पार पडणार
जिल्हा परिषदेची अजित पवार राष्ट्रवादी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे.. हल्ल्यानंत आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे.. जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस आरोपीचा शोध घेताय.. घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे..
यवतमाळ शहर आणि उपविभागातील विविध मंगल कार्यालयांमध्ये लग्नाच्या गडबडीत दागिन्यांच्या बॅगा चोरीला जाण्याच्या घटनांनी पोलिसांची झोप उडवली होती या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी थेट मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात धडक देत कारवाई केली.यामध्ये 19 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलाय.
गेल्या 18 दिवसा पासून इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम मोठया प्रमाणात जाणवू लागला आहे. युद्धामुळे मोठया प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली असल्याने त्याचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यवसायाला बसत असून,सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने आणि हॉटेल बंद ठेवता येत नसल्याने काहींनी आता लाकूड आणि कोळसा चुलीचा पर्याय निवडून किचन सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.शासनाने हॉटेल्सला गॅस पुरवठा करून दिलासा द्यावा अशी मागणी गॅस टंचाईमुळे हैराण झालेल्या हॉटेल मालकांनी केली.
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची आज निवड होणार आहे.. महायुती की महाविकास आघाडी, की "सांगली पॅटर्न" याची उत्सुकता लागून राहिले आहे.. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याचं पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही.. त्यामुळे सत्तेचा पेच कायम आहे..
तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गटाने एकत्रित येण्याचा रणनीती आखली आहे.. तर दुसऱ्या बाजूला भाजपाने मित्र पक्ष व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तेचा दावा केला आहे..
शहरी 30 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसानंतर गॅस सिलिंडर बुकींगची अट आहे.त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात एजन्सी बाहेर गॅस सिलिंडर साठी नागरिक भर ऊन्हात घराबाहेर पडताहेत.तर अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर साठी रांगा लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तात गॅस सिलिंडर वाटप केल्या जाताहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राहणार उपस्थित
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने स्पर्धा आयोजित
स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी येथे रंगणार कुस्तीचा थरार
पुणे ARO तर्फे अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १ एप्रिल पर्यंत सुरू
पुणे, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध
अग्नीवीर भरतीची लेखी परीक्षा अंदाजे १ जून ते १५ जून दरम्यान होणार असून त्यानंतर मैदानी चाचणी व वैद्यकीय तपासणी होणार
या भरतीत यश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगीकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्को) संचलित मेस्को करिअर अकॅडमी, सातारा येथे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन
येथे सैनिक जीडी, क्लार्क, स्टोअर किपर, नर्सिंग असिस्टंट व टेक्निकल या संवर्गांसाठी अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली लेखी व मैदानी परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व 88 शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा, संगणक टंकलेखन परीक्षा, लघुलेखन परीक्षा, अशा सर्व प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत असतात यामध्ये गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.
2025 26 च्या एन एम एम एस परीक्षा मध्ये सर्वात जास्त उत्तीर्ण टक्केवारी असलेल्या 27 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही झूम मीटिंग तसेच बैठे भरारी पथक व बदली कर्मचाऱ्यांची नेमणूक करून गैरप्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. परिणामी यामधील काही परीक्षा केंद्रांवर उत्तीर्ण टक्केवारी तब्बल 95% वरून नऊ टक्क्यांवर ती खाली आली आहे. याच धरतीवर जानेवारी 26 च्या संगणक टंकलेखन परीक्षांमध्ये 48 परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले. पर्यायाने यामधील काही परीक्षा केंद्रावरील टक्केवारी देखील 97 टक्क्यावरून आठ टक्क्यापर्यंत खाली आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने विविध परीक्षा घेतल्या जातात या परीक्षांवरती आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आले त्याचा फायदा परीक्षा परिषदेला झाला. त्याच परीक्षा केंद्रावर आज दहा ते पंधरा टक्के निकाल लागत आहे. त्यामुळे सीसीटीव्हीचा दणका या परीक्षा केंद्रांना बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.