Fire Accident : अग्निकांड! कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ सिलिंडरचा स्फोट, ७ जणांच मृत्यू

electric car short circuit : इलेक्ट्रिक कार चार्जिंगदरम्यान शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली आणि गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत.
electric car short circuit
electric car short circuitSaam TV
Published On

electric car charging short circuit leads to deadly fire in Indore full details : घराबाहेर पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये शॉर्ट सर्किट झाले अन् एकापाठोपाठ चार सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदोरमधील टिळक येथे ही हृदयद्रावक घटना घडली. घराबाहेर ई-कार चार्ज करत असताना शॉर्ट सर्किट झाल्याने संपूर्ण घर क्षणार्धात जळून खाक झाले. घरातील १५ गॅस टाक्यांपैकी चार टाक्यांचा स्फोट झाल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.

मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमधील बंगाली स्क्वेअरजवळ असलेल्या प्रीती नगर परिसरातील एका घरात ही धक्कादायक घटना घडली. घरात सिलिंडरचे १५ गॅस होते. बाहेर इलेक्ट्रिक कार चार्गिंगला लावून कुटुंबिय झोपले होते. पण त्याचवेळी शॉर्ट सर्किट झाले अन् गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट झाले. ४ सिलिंडर धडधड उडाले अन् एका क्षणात कुटुंबाचा जळून मृत्यू झाला. घरमालक मनोज पुगलिया यांच्यासह कुटुंबातील ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत ३ जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

electric car short circuit
सर्वात मोठी बातमी! इराणचा सर्वात शक्तिशाली नेता इस्रायली हल्ल्यात ठार; मुलाचाही मृत्यू, तेहरानमध्ये खळबळ

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मनोज पुगलिया यांनी घराबाहेरील पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक कार चार्ज होत असताना रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, चार्जिंग दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे कारला आग लागली. ही आग वाढत गेली अन् घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. धक्कादायक म्हणजे मनोज पुगलिया यांच्या घरात १५ गॅस सिलिंडर ठेवलेले होते. हे सिलिंडर आगीच्या धगीत सापडले. यातील ४ सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात घरालाही भयंकर आग लागली अन् ७ जण जळून खाख झाले. गॅस सिलिंडरचा स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता.

electric car short circuit
MBBS चा विद्यार्थी गोत्यात! दुबईच्या पोराला गाडी देणं पडलं महागात; मुंबईतील प्रतिकच्या मृत्यूला जबाबदार कोण?

दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळावर दाखल झाल्या. आगीवर निंयत्रण मिळवण्यात आले, पण तोपर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला होता. तीन जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेनं इंदोर हादरले असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

electric car short circuit
पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, क्रूझरची ट्रकला जोरात धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पुगालिया कुटुंबात एक कार्यक्रम होणार होता. त्याची तयारी जोरात सुरू होती. त्यासाठी काही नातेवाईक त्यांच्याकडे मुक्कामी आले होते. त्याचवेळी रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. एकापाठोपाठ एक स्फोट झाल्यामुळे कुणालाही घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आग इतक्या वेगाने पसरली की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी काल रात्री उशिरापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी उपस्थित आहेत. अग्निशमन दलाच्या पाचपेक्षा जास्त गाड्या आणि एसडीईआरएफच्या पथकाने बचावकार्य केले. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढले आहेत. मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

electric car short circuit
Mumbai : मुंबईत हादरवणारी घटना, नवऱ्याने बायकोला धावत्या लोकलसमोर ढकलले, मृत्यूआधी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com