पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, क्रूझरची ट्रकला जोरात धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

Indapur accident news : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये टायर फुटल्यामुळे क्रूझर गाडीने ट्रकला जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Indapur accident news
Indapur accident news
Published On

Pune Solapur Indapur accident news : पुण्यातील इंदापूरमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला असून ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. लोणी देवकरजवळ क्रुझरला ट्रकने जोरात धडक दिल्याने अपघाताची घटना घडली. वेगात असणाऱ्या क्रूझर गाडीचं टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. क्रूझर थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडकल्याने अपघात झाला. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. तात्काळ मदत करण्यासाठी स्थानिक धावले. जखमींना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. पोलिसांनी ३ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तर अपघातग्रस्त वाहनांना ताब्यात घेतले असून तपास कऱण्यात येत आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात क्रुझर जीपचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये क्रुझर गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातामध्ये मृत पावलेले तिघेही लोणी देवकर एमआयडीसीमधील खासगी कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Indapur accident news
LPG : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त ९६ तासात एलपीजी सिलिंडर घरपोच होणार, अट फक्त एकच

अपघातानंतर घटनास्थळी वाहतूककोंडी झाली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर गाडीमधून हे ३ कर्मचारी प्रवास करत होते. यावेळी अचानक गाडीचा टायर फुटला आणि रस्ता दुभाजक ओलांडून ही गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या गंभीर अपघातात क्रुझरमधील चालकासह तिघेजण जागीच मृत्यू पावलेत. अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Indapur accident news
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा मध्यरात्री एअरस्ट्राइक, काबूलमध्ये ४०० जणांचा मृत्यू, २५० गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com