Pakistan Airstrike : पाकिस्तानचा मध्यरात्री एअरस्ट्राइक, काबूलमध्ये ४०० जणांचा मृत्यू, २५० गंभीर जखमी

Kabul airstrike news : अफगाणिस्तानमधील काबूल येथे पुनर्वसन केंद्रावर झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात ४०० जणांचा मृत्यू झाला असून २५० जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव अधिक वाढला असून तालिबानने कडक इशारा दिला आहे.
Kabul airstrike news
Kabul airstrike newsSaam TV Marathi
Published On

Pakistan Afghanistan conflict : इराण-इस्रायल युद्धाची धग अद्याप कायम असतानाच, आता भारताच्या शेजारीही युद्धाचा वणवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत. आता यामध्ये आणखी भर पडली आहे. पाकिस्तानने रमजान महिना सुरू असतानाच, अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये मध्यरात्री एअरस्ट्राईक (Pakistan airstrike on Kabul rehab center kills hundreds civilians) केला आहे. काबूलमधील एका पुनर्वसन केंद्रावर पाकिस्तानने बॉम्बहल्ला केला; यामध्ये उपचार घेत असलेल्या ४०० जणांचा मृत्यू झाला, तर २५० जण गंभीर जखमी आहेत. या एअरस्ट्राईकनंतर अफगाणिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे. तालिबान सरकारने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला असून, "याची किंमत मोजावी लागेल, आता कोणतीही चर्चा होणार नाही," असे स्पष्ट शब्दांत खडसावले आहे.

अफगाणिस्तानचे प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी पाकिस्तानच्या एअरस्ट्राईकवर नाराजी आणि संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "पाकिस्तानच्या लष्कराने काबूलमधील एका अमली पदार्थ पुनर्वसन केंद्रावर रात्री केलेल्या बॉम्बहल्ल्यातील मृतांची संख्या ४०० झाली आहे, तर २५० जण जखमी झाले आहेत." पाकिस्तानी सैन्याने रात्री ९:०० वाजताच्या सुमारास २००० खाटांच्या (Beds) 'ओमिद' व्यसन उपचार रुग्णालयावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात रुग्णालयाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बचावपथकाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. "रुग्णालयाच्या मलब्याखालून अनेक मृतदेह बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे," असेही फितरत यांनी सांगितले.

Kabul airstrike news
Kalyan : कल्याण हादरलं! फार्मा कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; बँक स्टेटमेंट तपासताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे की, "पाकिस्तानसोबत आता कोणतीही चर्चा होणार नाही, या हल्ल्याचा बदला घ्यावाच लागेल." दरम्यान, अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी अमली पदार्थ उपचार केंद्रावरील हल्ल्यात झालेल्या नागरिक जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बेनेट यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त करत दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचे, तसेच नागरिक आणि रुग्णालयांसारख्या सार्वजनिक सुविधांचे संरक्षण करण्यासह आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, असे वृत्त 'टोलो न्यूज'ने दिले आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाउंडेशननेही या हल्ल्याचा निषेध केला असून, रुग्णालये आणि उपचार केंद्रांसारख्या सार्वजनिक सुविधांना कधीही लक्ष्य केले जाऊ नये, यावर भर दिला आहे.

Kabul airstrike news
सहकारी बँकांच्या राजकारणात उलथापालथ होणार, सहकार मंत्रालयाच्या आदेशानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com