सहकारी बँकांच्या राजकारणात उलथापालथ होणार, सहकार मंत्रालयाच्या आदेशानं खळबळ

Maharashtra cooperative bank elections : सहकार मंत्रालयाच्या नव्या आदेशामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. १० वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुढील निवडणुकीत अपात्र ठरवण्याची शक्यता असून यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Cooperative Bank Election : दहा वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा बँक संचालकांवर गंडांतर येणार आहे. सहकार मंत्रालयाने काढलेल्या नवीन आदेशानुसार राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये ज्या संचालकांनी १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी संचालक म्हणून कार्यकाळ पूर्ण केला असेल,असे संचालक जिल्हा बँकेच्या पुढील निवडणुकीसाठी अपात्र असतील. district central cooperative bank directors rule

अधिनियम २०२५ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सहकार आयुक्तालयास कळविण्यात आल्या असून,यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील सहकार क्षेत्रावरील आपल्या वर्चस्वाला थेट धक्का लागण्यावरून एकूणच सहकारी बँकांमधील अनेकांची सहकारातील निवृत्ती अटळ मानली जात आहे.

त्यांच्या राजकीय वर्चस्वावरही गडांतर येण्याच्या शक्यतेने हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचीही डोकेदुखी वाढविणारी आहे. सहकारी बैंकिंग क्षेत्रामधील कोट्यवधी रुपयांचा गाडा सुरळित चालणार कसा? हा खरा प्रश्न उभा राहिला असून, याप्रकरणी न्यायालयातही दाद मागितली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com