MBBS चा विद्यार्थी गोत्यात! दुबईच्या पोराला गाडी देणं पडलं महागात; मुंबईतील प्रतिकच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Mumbai accident news today : मुंबईतील चांदिवली परिसरात अल्पवयीन मुलाने चालवलेल्या एसयूव्हीने स्कूटरला धडक दिल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात गाडी देणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्यावरही कारवाईची शक्यता असून पोलिस तपास सुरू आहे.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

Mumbai accident minor driver : दुबईहून ईदच्या सुट्टीसाठी मुंबईत आलेल्या एका १७ वर्षाच्या मुलाने एसयूव्हीने कारने स्कूरटला जोरात धडक दिली. यामध्ये १५ वर्षाच्या प्रतिक माने याचा मृत्यू झाला. अपघातानंतर १७ वर्षांच्या मुलाने घटनास्थळाहून पळ काढला होता. पण पोलिसांनी काही तासांच्या ताच त्याला बेड्या ठोकल्या. १७ वर्षाच्या मुलाकडे कार कुणी दिली, याचाही शोध घेत पोलिसांकडून गुन्हा दाखल केला. १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला २२ वर्षाचा मोहम्मद खान याने कार दिली होती. त्यामुळे एमबीबीएसचे शिक्षण घेणारा मोहम्मद अडचणीत आला, त्यालाही पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आले. (minor driving SUV causes fatal accident in Mumbai Chandivali full case details)

ईदची सुट्टी असल्यामुळे १७ वर्षाचा मुलगा कुटुंबासोबत मुंबईत आला होता. रविवारी रात्री तो रेंटवरील एसयूव्ही घेऊन बाहेर पडला. पण भरधाव वेगात एसयूव्हीने स्कूटरला जोरात धडक दिली. यात पाठीमागे बसलेला १५ वर्षाचा प्रतिक माने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीने पळ काढला. पण पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून कोर्टात हजर केले. बाल न्याय मंडळाने आरोपीला २७ मार्चपर्यंत सुधारगृहात पाठवले.

Accident News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला का गेले? मोदींसोबतच्या भेटीनंतर सगळं काही सांगितलं

साकीनाका पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोडला निघालेय, असे सांगून आरोपी घराबाहेर पडला होता. पण तो चांदिवलीकडे निघाला होता, त्यावेळी दुर्घटना घडली. अपघातानंतर चांदिवलीमध्येच एका नातेवाईकाच्या लपलेला होता, तिथूनच त्याला अटक करण्यात आली. त्या दिवसासाठी गाडी भाड्याने घेतलेल्या मोहम्मद खान या एमबीबीएस विद्यार्थ्यावर देखील आरोप लावण्यात आले आणि त्याला नोटीस बजावण्यात आली.

Accident News
IPL 2026 : धोनीसह यंदा आयपीएलमधून ५ जण निवृत्त होणार, या नावाची चर्चा

डीसीपी (झोन १०) दत्ता नलावडे यांनी या प्रकरणाची प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की,' २२ वर्षाच्या मोहम्मद खान याचा या अपघातात काय संबंध होता का? याची चौकशी करण्यात येत आहे. त्यानंकरच पुढील कारवाई केली जाईल. ' दरम्यान,१७ वर्षाचा आरोपी चालक गेल्या आठवड्यात ईद साजरी करण्यासाठी दुबईहून साकीनाकामध्ये कुटुंबियांकडे आला होता. पण त्यावेळी आक्रीत घडलं, असेही नलावडे म्हणाले.

Accident News
Mumbai : मुंबईत हादरवणारी घटना, नवऱ्याने बायकोला धावत्या लोकलसमोर ढकलले, मृत्यूआधी...

मृत प्रतीकचा भाऊ, सुमित माने यानं अपघाताबाबत पोलिसांना माहिती दिली. तो म्हणाले की, महिनाअखेर गावात एक लग्न होते. त्यासाठी खरेदी करण्यासाठी चांदिवलीमधून निघालो होतो. घरापासून थोडं दूर गेल्यानंतर अमृत शक्ती रोडवरील एका सोसायटी गेटमधून एसयूव्ही बाहेर आली आणि जोरात धडक दिली. त्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गाडीचा फक्त लायसन्स प्लेटचा काही भागच दिसला होता.

Accident News
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा मध्यरात्री एअरस्ट्राइक, काबूलमध्ये ४०० जणांचा मृत्यू, २५० गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com