

IPL 2026 : हैदराबादला नवा कर्णधार मिळणार; 'या' दोन नावांची जोरदार चर्चामोठी बातमी! पेट्रोल पंपावर आता केरोसीन मिळणार, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, वाचाआयपीएलचा यंदाचा हंगामा २८ मार्चपासून सुरू होणार आहे. आरसीबी आणि हैदराबाद या दोन संघामध्ये सलामीचा सामना बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे आयपीएलचं फक्त २० सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. लवकरच उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवलीच. पण धोनीसह ५ खेळाडू निवृत्त होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पाचही खेळाडूंनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. पण वय, फिटनेस आणि संघाचे समतोल या कारणामुळे हे खेळाडू आयपीएलमधून निवृत्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कोणते पाच खेळाडू यंदाच्या हंगामानंतर निवृत्त होऊ शकतात, त्याबाबत जाणून घेऊयात..
एमएस धोनी :
पहिल्या हंगामापासून धोनीनं आयपीएल गाजवली आहे. देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये त्याची वर्णी लागते. मागील काही हंगामापासून धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा होतात. यंदाही धोनी निवृत्त होणार असल्याचं बोलले जात आहे. धोनीचे वय आणि फिटनेस पाहता त्याचा हा शेवटचा हंगाम असेल, असे म्हटले जातेय.
जुलै २०२६ मध्ये धोनी ४५ वर्षाचा होईल. गेल्या काही वर्षांपासून त्याला गुडघ्याच्या समस्याचा सामना करावा लागलाय. त्यामुळे तो अखेरच्या काही षटकातच फलंदाजीला येऊन फटकेबाजी करतो. पण वाढत्या वयामुळे धोनीचा हा अखेरचा हंगाम असेल, असे म्हटलेय जातेय.
वेस्टइंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणही यंदाच्या आयपीएल हंगामानंतर निवृत्त होऊ शकतो. कोलकात्यासाठी त्याने १९२ विकेट घेतल्या आहेत, त्याशिवाय १७८० धावांचा पाऊश पाडलाय. मे २०२६ मध्ये तो ३८ वर्षांचा होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वाढते वय आणि फिटनेसमुळे तो आयपीएपललाही टाटा बाय बाय करण्याची शक्यता आहे.
इशांत शर्मा :
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आतापर्यंत आयपीएलमध्ये ७ संघांसाठी खेळला आहे. त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर जवळपास संपुष्टातच आले आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर त्याने टीम इंडियाकडून एकही सामना खेळलेला नाही. यंदाचा आयपीएल हंगाम त्याचा अखेरचा असू शकतो. यंदा गुजरातकडून खेळणारा इशांत शर्मा ३७ वर्षांचा आहे.
मुंबईकर अजिंक्य रहाणे आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे. त्यानं आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. तो आतापर्यंत सहा संघाकडून खेळलाय. २०२३ मध्ये चेन्नईकडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला होता. यंदा तो कोलकाताच्या संघाकडून खेळत आहे. या हंगामातही रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. जून २०२६ मध्ये अजिंक्य ३८ वर्षांचा होणार आहे, त्यामुळे कदाचीत तो यंदा निवृत्ती घेऊ शकतो.
मिचेल स्टार्क :
ऑस्ट्रेलियन प्रिमियम गोलंदाज मिचेल स्टार्कही यंदा आयपीएलमधून निवृत्त होऊ शकतो. यंदा तो खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. तो यंदा दिल्लीकडून खेळणार आहे. मिचेल स्टार्क याचं वय आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहता हा अंतिम हंमाग असल्याच्या चर्चा आहे. स्टार्कने आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी आपले योगदान देत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.