IPL 2026 : हैदराबादला नवा कर्णधार मिळणार; 'या' दोन नावांची जोरदार चर्चा

Sunrisers Hyderabad squad 2026 : आयपीएल 2026 आधी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. पॅट कमिन्स दुखापतीमुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता असून इशान किशन आणि अभिषेक शर्मा या दोन नावांमध्ये नव्या कर्णधाराबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
 pat cummins
pat cumminssaam tv
Published On

आयपीएलच्या नव्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. मात्र, त्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, असे वृत्त आहे. कमिन्सची दुखापत गंभीर असल्याने तो संघासोबत कधी जोडला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अपडेट मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर हैदराबाद संघाने नव्या कर्णधारासाठी चाचपणी सुरू केली असून दोन नावांची जोरदार चर्चा आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान किशन हैदराबाद संघाची धुरा सांभाळू शकतो. तर इतर काही रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शर्मा याच्या नावाचाही विचार सुरू आहे. गेल्या काही काळापासून अभिषेक आणि इशान दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नेतृत्व नक्की कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. TOI च्या वृत्तानुसार, हैदराबाद व्यवस्थापनाने या दोन्ही खेळाडूंच्या नावावर चर्चा केली असून, कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान किशन हा नेतृत्वासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचे मानले जात आहे. तर अभिषेक शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.

 pat cummins
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा मध्यरात्री एअरस्ट्राइक, काबूलमध्ये ४०० जणांचा मृत्यू, २५० गंभीर जखमी

इशान किशन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात २७ वर्षीय इशानने शानदार कामगिरी केली. त्याने सुरुवातीला सलामीवीर म्हणून छाप पाडली आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरही धावांचा पाऊस पाडला. विशेषतः पाकिस्तानविरुद्ध केलेल्या फटकेबाजीमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत आयपीएलमधील एक स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.

 pat cummins
Mumbai : मुंबईत हादरवणारी घटना, नवऱ्याने बायकोला धावत्या लोकलसमोर ढकलले, मृत्यूआधी...

इशान किशन आतापर्यंत आयपीएलमध्ये ३ संघांकडून खेळला आहे. त्याने ११२ डावांत २९९८ धावा केल्या असून, १३८ च्या स्ट्राईक रेटने १ शतक आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये २८८ चौकार आणि १३४ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांमध्ये धडकी भरते. तसेच, यष्टीरक्षक म्हणून त्याने आतापर्यंत ५९ झेल आणि ५ यष्टीचीत (स्टम्पिंग) करून मोलाचे योगदान दिले आहे.

 pat cummins
पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, क्रूझरची ट्रकला जोरात धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com