why Eknath Shinde met Narendra Modi in Delhi urgent visit reason : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली मोदींना भेटण्यासाठी गेल्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आले होते. एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले होते? भाजप-शिवसेनेत अंतर्गत वाद आहे का? याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. कोण काय बोलतं, ते बोलू द्या.. मला काय करायचं तो करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (details of Shinde Modi meeting and Maharashtra political strategy)
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रहार केला. राजकारणासाठी अनेक विषय आहेत, पण युद्धात सर्वांनी एक व्हायरला हवं, असे ते म्हणाले. युद्धा अडकलेल्यांना मोदींनी भारतामध्ये परत आणले, असे शिंदे म्हणाले. ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या खासदारांना भेटायला येत असतो, त्यांच्यासोबत काल बैठक झाली. आज पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक विषयावर चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली. अधिवेशन सुरू असेल तेव्हा मी दिल्लीत येत असतो. तशीच ही सदिच्छा भेट होती, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दिल्लीमध्ये आपले खासदार आहेत, अधिवेशन आहेत. त्यामुळे कोण टीका करतेय, कोण काय बोलतंय.. यापेक्षा मला काय करायचे ते मी करत असतो. यादरम्यान मोदींसोबत भेट झाली. विरोधक टीका करण्याचे काम करत असते, मी त्यांना कामातून उत्तर देतो. त्यांच्या टीकेकडे मी पाहत नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, मी कामातून उत्तर देतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मोदींसोबत २ तास चर्चा -
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास प्रदीर्घ चर्चा झाली. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सोडून उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनीतीवर चर्चा केली. निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून जी मदत मिळायला हवी होती, ती मिळाली नसल्याचा मुद्दा या चर्चेत प्रामुख्याने मांडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितेलं. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.