Mumbai Dadar Cafe Social media
लाईफस्टाईल

Mumbai Dadar Cafe: मुंबईकरांनो विकेंडचा प्लॅन अजून ठरला नाहीये? थांबा, दादरच्या 'या' फेमस कॅफेची करा सफर

Weekend Plans Dadar: दादर हे शहर मुंबईतल्या प्रत्येक माणसाच्या परिचयाचे ठिकाण आहे. हे शहर हजारो लोकांना त्याच्यात सामावून घेत असते. दादरमध्ये अनेक किस्से घडलेले आहेत. स्वांतत्र्यापुर्वीपासून हे शहर चांगलच गाजतय.

Saam Tv

दादर हे शहर मुंबईतल्या प्रत्येक माणसाच्या परिचयाचे ठिकाण आहे. हे शहर हजारो लोकांना त्याच्यात सामावून घेत असते. दादरमध्ये अनेक किस्से घडलेले आहेत. स्वांतत्र्यापुर्वीपासून हे शहर चांगलच गाजतय. तुम्ही अजुनही हे शहर फिरला नसाल तर लगेगचच येणाऱ्या रविवारी तुमच्या बायको किंवा प्रेयसीसोबत दादर फिरायला निघा. स्टेशनच्या बाहेरचं असलेल्या फुल मार्केटमधून सुंदर असा चाफा प्रेयसीला देऊन दादरमधल्या फेमस कॅफेंमध्ये घेऊन जा. आता यासाठी तुम्हाला कॅफे शोधायची काहीच गरज नाही. पुढील माहितीतुन तुम्हाला त्याबद्दल सर्वच माहिती मिळेल.

तुम्हाला माहितच असेल की, दादरमध्ये अनेक चित्रपटाचे उत्तम अभिनेते-अभिनेत्री तयार झाले आहेत. रविंद्र नाट्यमंदीर असो वा शिवाजी नाट्य मंदीर लोक तिथे अनेक काळ टिकून राहिले आहेत. तसेच तिथले काही प्रसिद्ध हॉटेल्ससुद्धा आहेत. ते आजही लोकप्रिय आहेत. आत्ता आपण अशाच लोकप्रिय कॅफेंबद्दल जाणून घेणार आहोत जे अनेक काळापासून प्रसिद्ध आहेत.

तिथे अनेक दिग्गज मंडळी आली आहेत. मुळात दादर हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. त्यात आई-वडील, त्यांची मुलं, त्यांची नातवंड, त्यांची मुलं अशा पिढ्यांपिढ्या दादरमध्ये आल्या असाव्यात. त्यात मुंबईकरांसाठी दादर हे फार जवळचे मग खरेदीला कुठे तर दादरला असं ठरायचं. मग खरेदीला आल्यावर तिथल्या कॅफेंमध्ये एकदा तरी भेट व्हायची. तिथल्या आसपासच्या कॉलेजच्या मुलांचे दादर हेच घर व्हायचं. चला तर जाणून घेऊ दादरजवळ असलेले फेमस कॅफे.

ग्रॅंडमम्मास कॅफे दादर इस्ट

दादर मधला हा फेमस कॅफे १९५० साली सुरू करण्यात आला. याचे महत्वाचे उद्देश म्हणजे इथे येणाऱ्या कपल्सना मनसोक्त वेळ घालवता यावा आणि उत्तम पदार्थांचा आस्वाद घेता यावा.

इराणी कॅफे

इराणी कॅफे हा त्याच्या डिजाईनच्या शैलीने तसेच उत्तम नॉनव्हेज जेवणासाठी अजुनही प्रसिद्ध आहे. हा कॅफे सुरुवातीला मुस्लिम स्थलांतरितांनी ९०साव्या शतकात सुरू केला होता. मग एका पारशीव्यक्तीने तो सांभाळला. या कॅफेत आजही लोक निसता चहा प्यायला का होईना पण येतात.

कॅफे कॉलनी स्टोर आणि रेस्टॉरंट दादर

दादरमध्ये अनेक इराणी कॅफे आहेत. त्यातलाच एक म्हणजे कॅफे कॉलनी स्टोर आणि रेस्टॉरंट आहे. हा कॅफे १९३२ साली सुरू केला होता. तेव्हापासून ग्राहक त्यांच्या विविध पदार्थांच्या प्रेमात आहेत. इथे अनेक दिग्गज मंडळी येवून आवडीच्या पदार्थांवर चांगलाच ताव मारून गेले आहेत. मुळात कॅफेत आपण जास्त वेळ बसायला जात असलो तरी तिथलं खाणं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. असे हे विविध कॅफे नेहमीच तुमच्या मनात घर करून राहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT