Manasvi Choudhary
कराड ढाबा स्टाईल अख्खा मसूर ही रेसिपी प्रसिद्ध आहे.
अख्खा मसूर रेसिपी बनवण्यासाठी मसूर,कांदा, लसूण, टोमॅटो, आलं, काजू , लाल तिखट, बटर हे साहित्य घ्या.
प्रथम मसूर 2-3 वेळा स्वच्छ धूवून रात्रभर भिजत घालावे.
सकाळी भाजी करताना ते छान शिजवून घेणे. शिजवताना त्यात खिसलेलं आले घालावे
नंतर कांदा, लसूण,टोमॅटो यांची बारीक पेस्ट करून घ्या.
नंतर गॅस वर एका भांड्यात गरम तेलामध्ये मोहरी आणि खडे मसाले घाला.
नंतर या फोडणीमध्ये आता त्यात कांदा लसूण पेस्ट घालून 2-3 मिनिट सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
संपूर्ण मिश्रणात लालतिखट, हळद, गरम मसाला, धने जीरे पूड घालून मसाला 3-4 मिनिटे परतून घेणे.थोडेसे पाणी घालावे. म्हणजे मिश्रण खाली चिकटत नाही.
आता या मध्ये शिजलेले मसूर घालावे.त्यातील 3-4 चमचे मसूर बाजूला ठेवावेत वराहिलेले मसूर त्यात घालावे
आता बाजूला ठेवलेले मसूर स्मॅश करून त्यात घालावे याने भाजी ला घट्ट पणा येतो. चवीनुसार मीठ घालून 5-6 मिनिट छान उकळी काढावी. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
मस्त झणझणीत अक्खा मसूर खाण्यासाठी तयार आहे.