Bottle Feeding Risks: लहान बाळांना बाटलीतून दूध पाजत असाल तर आत्ताच थांबवा, 'या' आजारांचा वाढतो धोका

Bottle-Feeding Babies: लहान बाळासाठी त्याचं दिवसभराचं अन्न म्हणजे त्याच्या आईचं पौष्टीक दूधचं असतं. आता सध्याच्या धावत्या युगात प्रत्येक आईला बाळंतपणानंतर जास्तकाळ घरी राहता येत नाही.
Bottle Feeding Risks
Bottle-Feeding Babiesgoogle
Published On

लहान बाळासाठी त्याचं दिवसभराचं अन्न म्हणजे त्याच्या आईचं पौष्टीक दूधचं असतं. आईच्या दूधाने फक्त शारिरीक भूक नाही तर इम्यूनिटी सुद्धा वाढते. बाळ अगदी वर्षभर आईचं दूध पितं मग त्याला इतर पदार्थ खायला देतात. प्रत्येकाच्या घरातल्या मोठ्या व्यक्तीचं हेच म्हणणं आहे की, बाळ जितकं आईचं दूध पितं, तितका त्याचा विकास होतो आणि कोणत्याही आजाराची त्याला लागण होत नाही.

आता सध्याच्या धावत्या युगात प्रत्येक आईला बाळंतपणानंतर जास्तकाळ घरी राहता येत नाही. त्यामुळे आईच्या अंगावरचं दूध बाळाला कमी मिळतं. मग त्यावर उपाय म्हणून बाळाला बाटलीतून दूध पाजलं जातं. मात्र ते शरीरासाठी कितपद योग्य आहे हे आपण पुढील मुद्यांद्वारे समजून घेऊया.

Bottle Feeding Risks
Astro Tips : घरात पैसा टिकत नसेल तर आजच बदला तिजोरीची दिशा, जाणून घ्या वास्तू टिप्स

इम्यूनिटी कमजोर होणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाला ६ महिनेतरी आईचे दूध द्यावे. मात्र ते शक्य नसल्यास आपण बाळाला बाटलीत दूध पाजायला सुरुवात करतो. त्याने बाळाची इम्यून सिस्टीम कमजोर होते. त्याने बाळाला सतत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

लठ्ठपणा

बाटलीने दूध पाजल्याने बाळांना लठ्ठपणाचा धोका होऊ शकतो. विशेषत: जेव्हा ते फॉर्म्युला दूध किंवा प्राण्यांच्या दूधावर अवलंबून असतात. कधीही लक्षात ठेवा की, जनावरांच्या दूधात चरबीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मुलांचे वजन वाढू शकतं.

फुफ्फुसांवर परिणाम

रबरी बाटलीतून दूध पिणाऱ्या मुलांची फुफ्फुसे आईचे दूध पिणाऱ्या बाळांपेक्षा कमकूवत असतात. त्यामुळे कमी वयातच त्यांना श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागू शकते.

बाटलीतले दूध टाळण्यासाठी उपाय

पंपिंग करून दूध साठवणे

तुम्ही आईचे दूध पंपात साठवून ठेवू शकता. जेणेकरून आई कामाला जाईल तेव्हा कोणीही सहज बाळाला दूध देऊ शकतं.

हायड्रेटेड राहणे

आईने सतत पाणी पित राहीलं पाहिजे. त्याचसोबत योग्य आहार घेतला पाहिजे. त्यात भाज्या फळांचा समावेश असला पाहिजे. तसेच पौष्टीक लाडू सुद्धा खाल्ले पाहिजे.

मुलांसोबत वेळ घालवणे

प्रत्येक आईने तीच्या लहान किंवा मोठ्या मुलांसोबत वेळ घालवणं महत्वाचं असतं. त्यावेळेस बाळाला स्तनपान देणे महत्वाचे आहे. इतर वेळेस बाळाला योग्य दूध न मिळाल्याने बाळ चिडचिड करतं किंवा रडत बसतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Bottle Feeding Risks
Varicose Veins: पायांच्या नसा ब्लॉक का होतात? यापासून लांब राहण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com