जून महिना सुरु झाला असून आता सर्वांना पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाळ्यात अनेकजण ट्रिपचा प्लान करतात. अनेकजण निसर्गाचा उत्तम अनुभव घेण्यासाठी परदेशात जातात. जर तुम्हीही परदेशात फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर बजेटमध्ये थायलँड हे उत्तम ठिकाण आहे. तुम्ही थायलँडमध्ये फिरायला जाऊ शकतात.
थायलँडचे निसर्गसौंदर्य हे खूपच मस्त आहे. येथील नाइटलाइफ पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. येथील अनेक आयलँडला तुम्ही भेट देऊ शकता. यासाठी आयआरसीटीसीने नवीन ट्रिप प्लान केली आहे. IRCTC ने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात थायलँड ट्रिप प्लान केली आहे. याच ट्रिपची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
आयआरसीटीसीचे थायलँड टूरचे पॅकेज ४ रात्री आणि ५ दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्ही फ्लाइटने प्रवास करु शकणार आहात. या ट्रिपमध्ये तुम्ही बँकॉक, पटाया या ठिकाणी फिरु शकणार आहात. ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या काळात ही ट्रिप प्लान करण्यात आली आहे. या ट्रिपमध्ये फ्लाइट तिकिटे, हॉटेल, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण समाविष्ट असणार आहे.
या ट्रिपमध्ये जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला ६१,२०० रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही दोन व्यक्ती प्रवास करत असाल तर तुम्हाला ५६,९०० रुपये भरावे लागतील. तीन जणांसाठी प्रति व्यक्ती ५६,९०० रुपये भरावे लागणार आहेत.
IRCTC ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. या ट्रिपचे पॅकेज तुम्ही अधिकृत वेबसाइटवरुन बुक करु शकता. याचसोबत IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयांमधून बुकिंग करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.