Instagram Scam: सावधान! इंस्टाग्राम अकाउंट हॅक होण्याचा नवीन प्रकार, 'या' टिप्स फॉलो करा अन्यथा...

Stay Safe From Hackers Tips: इंस्टाग्राम स्कॅमर्सनी लोकांना फसवण्याचा आणखी एक नवीन मार्ग शोधला आहे. आता इन्स्टाग्रामवर कंटेंट शेअर करणाऱ्यांना फसवलं जात आहे. तुम्हीही इन्स्टाग्रामवर कंटेंट शेअर करत असाल, तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.
Instagram Scam
Instagram ScamSaam Tv

Stay Safe From Instagram Hackers Tips

इंस्टाग्रामवर (Instagram) स्कॅमर्सनी लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत. इंस्टाग्रामवर लोकांचे अकाउंट हॅक करणारा एक नवीन प्रकार उघडकीस आला आहे. जर तुम्हाला तुमचे खाते फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवायचं असेल, तर तुम्ही सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. (latest marathi news)

फसवणूक करणाऱ्यांनी आता इंस्टाग्रामवर कंटेंट पोस्ट करणाऱ्या लोकांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. फसवणूक करणारे लोकं भासवतात की, त्यांना इन्स्टाग्रामवरून संदेश येत आहेत. संदेशात असे लिहिले आहे की आम्हाला तुमच्या खात्यावर आमच्या कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करणारी काही सामग्री आढळली (Instagram Hack) आहे. तुमचे अकाउंट पुढील 24 तासांत बंद केले जाईल, असं आपल्याला सांगितलं जातं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंस्टाग्राम अकाउंट हॅक स्कॅम

आपल्याला आमची चूकीचं सांगत आहोत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉपीराइट आक्षेप फॉर्म भरू शकता. हा फॉर्म भरण्यासाठी एक लिंक देखील शेअर केली (Stay Safe From Hackers Tips) आहे, असा संदेश येतो. इन्स्टाग्रामवर चांगली पोहोच आणि फॉलोअर्स असलेला कोणताही वापरकर्ता हा संदेश पाहिल्यानंतर नक्कीच घाबरू शकतो. याचाच हॅकर्स फायदा घेतात. या अज्ञात लिंकवर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्याचे खाते हॅक होते.

तुमचं अकाउंट हॅक (Instagram account hack scam) झालंय, असं तुम्हाला वाटत असेल तर इन्स्टाग्राम सपोर्ट टीमशी त्वरित संपर्क साधा. इंस्टाग्राम टीमला सांगा की, तुमचं अकाउंट हॅक झाले आहे.

Instagram Scam
Instagram Feature : अर्रर्र.. इन्स्टाग्रामवर चुकीचा संदेश पाठवला! काळजी नका करू, 'या' फीचरमुळं सुधारता येणार चूक

फसवणूक टाळण्यासाठी काय करावं

  • क्लिक करू नका

    इन्स्टाग्रामवरील कोणत्याही अज्ञात लिंक किंवा संदेशावर क्लिक करू नका.

  • तपशील शेअर करू नका

    इन्स्टाग्राम युजरनेम, आयडी किंवा पासवर्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. (Instagram account)

  • अधिकृत वेबसाइटचा वापर

    ब्राउझरद्वारे Instagram वापरत असाल, तर लक्षात ठेवा की फसवणूक करणारे बनावट लॉग-इन पेज तयार कतात. त्यामुळे अधिकृत वेबसाइटचा वापर करा.

  • मजबूत पासवर्ड

    अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी, एक मजबूत पासवर्ड आवश्यक आहे.

  • टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

    आता अनेक ॲप्स वापरकर्त्यांना सुरक्षिततेसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा देतात. ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर चालू करा.

Instagram Scam
Instagram:'या' कारणामुळे नाही वाढत तुमचे Instagram वरील Followers; 'या' ट्रिक्सने व्हायरल करा कटेंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com