चुकीचा संदेश गेल्यामुळे अनेकदा गैरसमज होतात. अनेकवेळा घाईत आपण इन्स्टाग्राम (Instagram) किंवा इतर मेसेजिंग अॅपवर चुकीचा संदेश टाइप करतो. हा संदेश पाठवलाही जातो. त्यानंतर आपण समोरची व्यक्ती काय विचार करेल, असा विचार करत बसतो. बहुतेक वेळा याचा पश्चाताप देखील होतो. ही चूक सुधारण्यासाठी इंस्टाग्रामने मेसेज एडिट फीचर आणलं आहे, त्याबद्दल आपण येथे जाणून घेवू या. (latets marathi news)
आता सर्व मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाठवलेले संदेश संपादित करण्याचा पर्याय देत आहेत, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम देखील संदेश संपादित करण्यासाठी समान पर्याय देत आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम यूजर (Message Sent On Instagram) असाल आणि तुम्हाला या मेसेज एडिट फीचरबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंस्टाग्राममध्ये इनबिल्ट फीचर
बऱ्याच मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, पाठवलेला मेसेज एडिट केल्यास, मेसेज रिसीव्हरला पाठवलेला मेसेज एडिट झाला असल्याची सूचना मिळते. पण, इन्स्टाग्रामच्या फीचरमध्ये (Instagram feature) असं होत नाही. ही युक्ती वापरण्यासाठी, थर्ड पार्टी अॅप किंवा इतर कोणत्याही त्रासाची गरज नाही, कारण हे फीचर इंस्टाग्राममध्ये इनबिल्ट दिलेलं आहे.
'अशा' पद्धतीने करा मेसेज एडिट
मेसेज एडिट करण्यासाठी प्रथम तुम्हाला इन्स्टाग्राम चॅटवर जावं लागेल. ज्या व्यक्तीला तुम्ही चुकीचा संदेश पाठवला आहे, त्यावर क्लिक करावं लागेल. यानंतर लॉग दाबा आणि हा चुकीचा संदेश कॉपी करा. यानंतर, पुन्हा लॉग दाबा आणि ते हटवा. व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅप्सप्रमाणे, इन्स्टाग्राम या डिलीट केलेल्या मेसेजची सूचना यूजर्सना पाठवणार (Instagram feature) नाही. आता कॉपी केलेला संदेश पुन्हा चॅट बॉक्समध्ये पेस्ट करा आणि तुम्हाला जे बदल करायचे आहेत ते करा. ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर, आता तुम्ही एडिटेड मेसेज पाठवता, त्यातील मेसेज रिसीव्हरला कोणतीही सूचना मिळणार नाही.
इंस्टाग्रामचं नवं फीचर
इंस्टाग्रामच्या या नव्या फीचरला (Instagram feature) बॅकड्रॉप असं नाव देण्यात आलं आहे. सध्या बॅकड्रॉप फीचर फक्त यूएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामवर पाठवलेले मेसेज एडिट करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, याचा अर्थ तुम्ही मेसेज कधीही संपादित करू शकणार नाही. नवीन अपडेटनुसार, तुम्ही इन्स्टाग्रामवर पाठवलेले मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत एडिट करू शकाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.